Press "Enter" to skip to content

आमदार रवीशेठ पाटील यांची खासदार सुनील तटकरे यांच्यावर जहरी टीका

विकास कामांच्या नावावर भंपकगीरी करणाऱ्या तटकरेंना जनता माफ करणार नाही : आमदार रविशेठ पाटील

सिटी बेल | पेण | वार्ताहर |

पेण मतदार संघात मागच्या दोन वर्षांपासून आपण विकासात्मक कामे करून जवळपास १३ कोटी निधी आणला असून वाशी शिर्की रस्त्यांकरीता आपणच निधी उपलब्ध केला आहे याकरीता केंद्र स्तरावर त्याचे पत्रव्यवहार केले असल्याने पेणच्या विकासाकरिता आपलाच हातभार असून खासदार सुनिल तटकरे हे विकास कामांच्या नावावर भंपकगीरी करीत लोकांना भुलविण्याचे काम करीत असल्याचे आमदार रविशेठ पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षप्रवेश मेळावा दि.२८ रोजी पेण येथे झाला या मेळाव्यात अनेकांनी पक्ष प्रवेश केला त्यातील भाजपचे एक दोन कार्यकर्ते सोडले तर कोणीही नव्हते त्यामुळे पेण मध्ये भाजपला कधीच खिंडार पडणार नसून जनता तटकरेंच्या खोट्या वल्गना भुलणार नाहीत ज्यावेळी पेण अर्बन बँक बुडाली त्यावेळी खासदार सुनिल तटकरे हे राज्याचे अर्थमंत्री होते मात्र त्यांनी बॅंक वाचविण्यासाठी कोणतेच प्रयत्न केले नाहीत यासह जलसंपदा मंत्री असताना सुद्धा खारेपाटातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविला नाही मात्र आपणच खारेपाटात पाणी आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.त्यामुळे तटकरेंची आता बनवाबनवी दिर्घकाळ टिकणारी नाही असेही त्यांनी शेवटी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.