Press "Enter" to skip to content

गुरव समाजाकडून अभिनव उपक्रम, देवस्थान ट्रस्ट संदर्भात कायदेशीर मार्गदर्शन

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

खालापूर तालुक्यातील अष्टविनायक क्षेत्र महड येथे अखिल गुरव समाज संघटना रायगड ठाणे मुंबई संस्था यांच्यावतीने अभिनव उपक्रम राबविण्यात आला.यावेळी संघटना आपल्या दारी देवस्थान -जमीन ट्रस्ट संदर्भात उपस्थितांना कायदेशीर मार्गदर्शन करण्यात आले.

या अभियानात बऱ्याच समाज बांधवांनी त्यांचे देवस्थान ट्रस्ट संदर्भातील प्रश्न उपस्थित मान्यवरांसमोर मांडले व आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.या कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शन कायदेशीर सल्लागार अँड मुकुंदराव आगलावे साहेब यांचे सह संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अँड अण्णासाहेब शिंदे यांनी केले.तसेच गुरव समाजाचे जेष्ठ नेते दत्तात्रय मसुरकर,प्रदेश देवस्थान समिती अध्यक्ष धनजंय दरे, महसुल मंडल विभाग अधिकारी अनिल तोरमडल यांनी देखील उपस्थित गुरव समाज बांधवांना मार्गदर्शन केले.

दरम्यान रायगड जिल्हा अखिल गुरव समाज संघटना व गुरव समाज रायगड-ठाणे-मुबंई,संस्था पदाधिकारी व महड गुरव समाजबांधव यांच्यावतीने व्यवस्थितरित्या नियोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राज्यभरातून मराठवाडा, विदर्भ,खांदेश,कोकण,उत्तर महाराष्ट्र,मुबंई विभाग व इतर विविध जिल्ह्यांतून गुरव समाजाचे महिला पुरुष युवक युवती उपस्थित होते.

यावेळी कन्यादिनाचे औचित्य साधुन कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सर्व महिला पदाधिका-यांचा सन्मान करण्यात आला.याप्रसंगी उपस्थित मान्यवर प्रदेश अध्यक्ष सुधाकरभाऊ खराटे, प्रदेश मानद अध्यक्ष वसंत बंदावनेसर, शिवाजी साखरे, कार्यकारी अध्यक्ष नवल शेवाळे, संतोष वाघमारे, मुख्यसरचिटणीस सुभाष आण्णा शिंदे,विलास पाटील, महिला प्रदेश अध्यक्षा सुरेखाताई तोरडमल,
महिला मानद अध्यक्षा संगीताताई गुरव,
महिला मुख्यसरचिटणीस मनिषाताई पांडे,श्रद्धाताई साखरे, मुख्य प्रवक्ता सोशल मिडीया अनिल पुजारी,युवक प्रदेश अध्यक्ष विजय ठोसर, प्रदेश उपकार्याध्यक्ष सुरेश गुरव रायगड-ठाणे-मुबंई,संस्था अध्यक्ष बंडू खंडागळे व सर्व उपस्थित कार्यकारिणी पदाधिकारी सदस्य, रायगड जिल्हा अध्यक्ष अमोल गुरव,जिल्हा देवस्थान समिती अध्यक्ष संतोष गुरव,
व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते समाज बांधव उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.