अध्यक्ष नरेंद्रशेठ जैन यांनी केले बहुमोल मार्गदर्शन
सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नागोठणे व्यापारी पतसंस्थेची १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शासनाच्या नियमावालीनुसार मंगळवार दि. २८ सप्टेंबर, २०२१ रोजी येथील हॉटेल कामत मध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. या सभेत विषय पटलावरील सर्व ठराव एकमताने व सर्वानुमते मंजूर करण्यात आले. यावेळी नागोठणे व्यापारी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्रशेठ जैन यांनी उपस्थित सभासदांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.
शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेल्या या वार्षिक सभेला पतसंस्थेचे उपाध्यक्ष भाई टके, सचिव प्रविण जैन, संचालक अनिल काळे, प्रकाश जैन, डॉ. राजेंद्र धात्रक, राजेंद्र जैन, शब्बीर नागोठणावाला, गणेश नागोठकर, दिलीप शहासने, सौ. वर्षा तेरडे, सौ. शोभा जैन, बिपीन सोष्टे, व्यवस्थापिका सौ. पूर्वा वैद्य आदींसह सभासद व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
दरम्यान पतसंस्थेच्या इतिवृत्त, तेरीज-ताळेबंद, नफा-तोटा पत्रक, वार्षिक अवहालाचे वाचन व्यवस्थापिका सौ. पूर्वा वैद्य यांनी केले. त्यास सर्व सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. या सभेचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव प्रवीण जैन यांनी केले तर आभार प्रदर्शन संचालक डॉ. राजेंद्र धात्रक यांनी केले. सभेच्या सुरुवातीसच यावर्षी दिवंगत झालेले संस्थेचे सभासद व नागोठणे शहर व विभागातील दिवंगत मान्यवर व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली.







Be First to Comment