सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |
शिक्षण प्रसारक संस्था सवाद धारवली संचालित माध्यमिक विद्यालय सवाद येथील सन 1990-91ला शालांत परीक्षा देऊन निरोप घेतलेली आणि वेगवेगळया क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन अधिकारी पदावर काम करत असलेली उत्तम प्रकारे स्थिरस्थावर असलेल्या या माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी 30 वर्षांनंतर त्यांचे वेळेचे सर्व निवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर तसेच विद्यमान शिक्षक यांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले. यावेळी माध्यमिक विद्यालय सवाद येथे संस्थेचे कार्यवाह दत्तात्रेय उतेकर हे अध्यक्ष होते.
प्रारंभी आत्तापर्यंतचे सर्व दिवंगत संस्था पदाधिकारी, सभासद, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, पालक आणि विद्यार्थी विद्यार्थिनी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली आणि सर्व माजी आणि आजी गुरूजनांना विशेष सन्मानपत्र ,शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थी विद्यार्थिनीसाठी पेन व भोजन, विद्यालयासाठी फॅन आणि कपाटं असे 75 हजार रूपयांचे साहित्य देण्यात आले.
विद्यार्थी दशेतील किस्से या विद्यार्थ्यांनी आणि सर्व गुरुजनांनी सांगताना आम्ही कसे आणि कोणामुळे घडलो हे सांगताना परस्पर सहकार्य प्रेम, आपुलकीच्या भावना दाटून आल्या. यावेळी बॅचचे विद्यार्थी द्वारकानाथ बबन गुरव यांची रोटरी क्लब ऑॅफ इंडिया, महाडचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी अनिल उतेकर, भरत कदम, मंगेश तांबे, नरेंद्र लाड, समीर जैतपाल, सुरेश खेडेकर, सचिन जैतपाल, महेश खेडेकर, राहुल जैतपाल, वनिता खोपकर- खेडकर, वर्षा महाकाळ-शेटये, हेमलता जंगम, इंदु मांढरे, संगीता सकपाळ, शर्मिला रांगडे आदी 35 माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू जाधव यांनी तर आभार मुख्याध्यापिका ज्योत्स्ना मेहता यांनी केले.







Be First to Comment