Press "Enter" to skip to content

निलेश महाडीक यांची मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड दक्षिण रायगडजिल्हा उपाध्यक्षपदी निवड

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |

रोहा तालुक्यातील पुई गावाचे सुपुत्र, समाजसेवक व धडाडीचे कार्यकर्ते निलेश महाडीक यांची मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र कोकण विभाग अध्यक्ष शिवश्री सचिन जगदीश सावंतदेसाई तसेच दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष शिवश्री वैभव हरिचंद्र सुर्वे,शिवश्री राजु सुतार यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त पत्र देऊन निवड करण्यात आली.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी व मोठया प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करतांना आपली शाखा व संघटना मोठया प्रमाणात तळागाळातील लोकांच्या समस्या सोडवणार असुन अन्याया विरुद्ध पुढे येईल. तसेच संभाजी ब्रिगेडचे हाती घेतलेल्या सर्व कामांना तसेच महापुरुषांच्या विचारांचा प्रसार पोहचविण्याचे कार्य करेल.अशा विविध प्रकारच्या समस्यांनावर ही संघटना काम करेल.त्याच बरोबर राष्ट्रमाता,राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची प्रेरणा घेऊन हे कार्य पुर्ण करण्याची शिवश्री निलेश महाडीक यांनी शपथ घेऊन सर्वाना मार्गदर्शन केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.