Press "Enter" to skip to content

प्रा.शाळा मुठवली खु.दुरूस्तीसाठी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडून 3 लाखांचा निधी

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

रोहे तालुक्यातील प्रा.शाळा मुठवली खु.या शाळेच्या दुरूस्ती कामासाठी रा.जि.कर्तव्यदक्ष पालकमंत्री आदिती तटकरे यांनी रू.3 लाखाच्या निधी उपलब्ध करून दिला आहे व तशाप्रकारचे निधी मंजुरीचे पत्र ग्रामस्थांना देण्यात आले आहे.

साखरचौथ गणेशोत्सव निमित्त पालकमंत्री आदिती तटकरे यांनी मुठवली खु.येथे सदिच्छा भेट देऊन गावात स्थानापन्न केलेल्या साखरचौथ गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.यावेळी त्यांनी शाळा दुरुस्तीसाठी मंजूर केलेल्या निधीचे पत्र ग्रामस्थांना दिले.

यावेळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष जयवंत मुंडे व पदाधिकारी मयूर खैरे, प्रसाद देशमुख,
यांच्यासह गाव कमिटी अध्यक्ष सतिष ठाकूर,युवा कार्यकर्ते महेश तुपकर, मारुती तुपकर, चंद्रकांत शिंदे,योगेश शिंदे,मंगेश तुपकर,रोहिदास तुपकर, संतोष तुपकर, प्रमोद ठमके,येनाजी शिंदे,नागेश खंडागळे,तानाजी ठमके, सचिन तुपकर,धनराज शिंदे,रामचंद्र शेळके,शिवतेज शिंदे,प्रकाश तुपकर, ज्ञानेश्वर शिंदे, ऋषिकेश खंडागळे, सौरभ ठाकूर,मयुरेश तुपकर,गणेश शिंदे,संदेश तुपकर,मनोज शिंदे,गौतम सावंत,संतोष शेळके, अनंत फणसे तसेच गावातील प्रतष्ठित व्यक्ती, युवक, युवती व सर्व ग्रामस्थ महिला मंडळ,युवक मंडळ तसेच भजन मंडळातील सर्व सांप्रदायिक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान पालकमंत्री आदिती तटकरे यांनी शाळा दुरूस्तीसाठी रू.3 लाखाचा निधी मंजूर केल्याने मुठवली खु.ग्रामस्थांनी त्यांचे जाहिररित्या आभार व्यक्त केले आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.