आदिवासी भाजीविक्रेत्या महिलांना मोफत तराजू, टोपली व शिलाईं मशिनचे वाटप
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
रसायनीनजीकच्या कर्नाळा कल्हे फाटा येथे मुंबई गोवा रस्त्यावर भाजीविक्री करणा-या ४५ आदीवासी ठाकूर जमातीच्या महिलांना अर्चंना ट्रस्टच्यावतीने मोफत प्रत्येकी एक तराजू,एक टोपली तसेच शिवणकाम शिकलेल्या पाच आदीवासी युवतींना शिलाईं मशिनचे मोफत वाटप प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत यांच्या हस्ते फित कापून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या आभार प्रदर्शनासाठी आदीवासी महिलांनी रानावनातून पाना फुलांपासून आकर्षक पुष्पगुच्छ बनविले होते. आभार प्रदर्शंनात हे पुष्पगुच्छ आकर्षण ठरले.यावेळी अर्चंना ट्रस्टचे सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर घरत यांनी ट्रस्टच्या कार्याची माहिती दिली.

आदीवासी विकास प्रकल्प अधिकारी अधिकारी वाघ मॅडम व सोलसकर यांनी भाजीविक्रेत्या आदीवासी महिलांना मदत म्हणून शासनाकडून प्रत्येकी वीस हजार रुपये अनुदान देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.तर ग्रामपंचायत पंधरा टक्के निधीतून आदीवासी भाजीविक्रेत्या महिलांना मदत देणार असल्याचे सरपंच साजीर दळवी यांनी सांगितले.तर दशरथ गायकर यांनी अर्चना ट्रस्टच्या रत्नाकर घरत यांनी आदीवासी महिलांसाठी राबविलेल्या कार्यक्रमाचे कौतुक करुन रसायनी पाताळगंगा परीसरासह विविध ठिकाणच्या आदीवासी वाड्यांत आदीवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी अर्चना ट्रस्ट महत्वाचे समाजकार्य करीत असल्याचे सांगितले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत यांनी सांगितले की माझ्या या जिल्हा परिषद विभागात एकूण 33 आदीवासीवाड्या येतात.या वाड्यांत अर्चंना ट्रस्ट विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित आहे.आदीवासी बांधवांसाठी काम करणे हे आमचे कर्तंव्य आहे.या समाजातील समस्या सोडविण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील आहे.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, पंचायत समिती सदस्या मनिषा मोरे,आदीवासी विकास प्रकल्प अधिकारी वाघ मॅडम व सोलसकर साहेब, सरपंच साजीर दळवी,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संतोष पाटील, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते दशरथ गायकर, युसूफ मेहरआली सेंटरचे सुरेश रासम,सरपंच गिता भगत,राष्ट्रसेवा दलाचे संतोष ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य वैशाली पवार,माजी सदस्य दिनेश पाटील, राजेंद्र म्हात्रे, शेखर कानाडे,जीवन टाकले,कमळाकर टाकले,संजय म्हात्रे,बाळशेट पाटील, रामदास गुरव, अर्चंना ट्रस्टचे कर्मचारी निलेश पाटील, जयेश म्हात्रे, सुरेखा पाटील आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन व सुत्रसंचलन रत्नाकर घरत यांनी पाहिले.अखेर आदीवासी प्रकल्प अधिकारी वाघ मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर सुमधुर आवाजात संगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.







Be First to Comment