Press "Enter" to skip to content

जागतिक पर्यटन दिनानिमित्त वरसोली येथे स्वच्छतेसाठी श्रमदान

सिटी बेल | अलिबाग |अमूलकुमार जैन |

अलिबाग तालुक्यातील वरसोली समुद्रकिनारा साफसफाई आणि प्लास्टिक कचरा संकलनाचा कार्यक्रम विवध संघटना मार्फत घेणेत आला यासाठी 50 हून अधिक लोकांनी सहभाग घेतला.

या अभियानात रोटरॅक्ट चे प्रतीक, तन्वी, गौरी, हर्षवर्धन, अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्था अलिबाग- रायगड चे उपाध्यक्ष शेखर पडवळ, वरसोली कॉटेज वेल्फेअर चे अध्यक्ष मकरंद नाईक, माणुसकी प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉक्टर राजाराम हुलवान, तानाजी आगलावे व त्यांचे सदस्य, तसेच वरसोली ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

रोटरी क्लब अलिबाग सीशोर चे अध्यक्ष डॉ. चांदोरकर, माजी अध्यक्ष डॉ. किरण नाबर, खजिनदार निमिष परब, भड, डॉ. राजश्री चांदोरकर, रूपाली शेठ, कुमार जोगळेकर,गौरव माळी, DWSM चे रवीकिरण गायकवाड,आनंद धिवर आदी उपस्थितीत होते.

जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जिल्हा परिषद रायगड जयवंत गायकवाड यांनी स्वछता ही सेवा अभियाना अंतर्गत नागरिकानी लोकसहभाग देऊन गाव परिसर स्वच्छ करावा असे आवाहन केले तसेच कौस्तुभ ताम्हणकर यांनी शून्य कचरा संकल्पनेतून घनकचरा व प्लास्टिक व्यवस्थापन याबद्दल तसेच कचरा निर्माण होऊ नये त्याचे पैशांमध्ये कसे रूपांतर करावे याबद्दल माहिती दिली.

यावेळी डॉ नाबर,डॉ चांदोरकर,श्री पडवळ,डॉ राजाराम हुलवान , आगलावे,गौरी मॅडम यांनी पर्यटकांनी फिरायला जाताना राखायची स्वछता व या बाबतची जनजगृती या विषयी समयोचित मार्गदर्शन केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.