Press "Enter" to skip to content

लाकडी फर्निचर मध्ये दबा धरुन बसला होता १० फुट लांबीचा अजगर…

पुढे काय झालं….. वाचा ही बातमी

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

याबाबत प्राप्त माहितीनुसार सोम.दि.२७ रोजी रात्री ८ वा.सुमारास संभे स्टाँपजवळील निशिकांत सानप यांच्या फर्निचर शॉपमध्ये लाकडी फर्निचर असलेल्या ठिकाणी अजगर
दडून बसला असल्याची माहिती सर्पमित्र सागर दहिंबेकर याला
मिळताच सागरनेही याबाबत आपले अन्य सर्पमित्र अजय भोसले, निलेश लोखंडे, अजय राजीवले, प्रथम भालेकर, संदेश यादव, सुरज भिसे, नितीन भोसले यांच्याशी संपर्क साधला. व या आपल्या टीमला घेऊन पोहचला.

लाकडी फर्निचरमध्ये दबा धरून बसलेल्या भल्या मोठ्या लांबीच्या अजगरास मोठ्या शितापिने अजगराला पकडुन कोलाड विभाग वनाधिकारी राजेश तलकर,प्रवीण शिंदे यांच्या ताब्यात दिले व वन अधिकारी यांनी या अजगराचे उंची व वजन तपासले असता १० फुट लांब व १५.५० किलो ग्र. इतके वजन भरले.

रेस्कु टीमचे सागर दहिंबेकर, अजय भोसले, निलेश लोखंडे, अजय राजीवले, प्रथम भालेकर, संदेश यादव, सुरज भिसे, नितीन भोसले यांनी पकडलेल्या १० फुट अजगरास वनाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षितरित्या जंगलात सोडून दिले.तर सर्पमित्रांच्या या टिमचे सर्वत्र कौतूक होताना दिसत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.