खोपोलीकरांचे रुण कधापी विसरणार नाही – उपायुक्त पनवेल महानगरपालिका गणेश शेटे
सिटी बेल | काशिनाथ जाधव
पाताळगंगा |
खालापूर प्रेस क्लब ही पत्रकारांची संघटना रायगड प्रेस क्लब संलग्न वर्षभर एस.एम.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली समाज हिताचे कार्यक्रम राबवित असताना खालापूर प्रेस क्लबने अनोखा कार्यक्रम हाती घेत खालापूर तालुक्यासह खोपोली शहरात नव्याने शासकीय पदभार स्वीकारलेल्या सर्व अधिकारी वर्गाचा खालापूर प्रेस क्लबच्या वतीने माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी नेते दत्ताजी मसुरकर व शिवसेना गटनेते तथा शहरप्रमुख सुनिल पाटील यांच्या हस्ते स्वागत समारंभ व खोपोली नगरपालिकेचा मुख्याधिकारी पदाचा कारभार सोडून गेले गणेश शेट्टे याचा निरोप समारंभ पार पडल्याने खालापूर प्रेस क्लबच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
तर निरोप सोहळ्याप्रसंगी तात्कालिन मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की, खोपोलीकरांचे रुण कधापी विसरणार नसून खोपोली करांनी वेळोवेळी दिलेले प्रेम हे चांगले कार्य करण्यास उर्जा देत असे.
खालापूर प्रेस क्लब ही संघटना खोपोली शहरासह खालापूर तालुक्यात लेखणीच्या माध्यमातून अनेक समस्यांना वाचा फोडण्याचे काम करीत असताना असंख्य दुर्बल घटकांना प्रसिध्दीच्या झोतात आणण्याचे काम करून सर्वसामान्याचे प्रश्न शासन दरबारी पोहचवत आहे, तर ही संघटना फक्त पत्रकारिता न करताना अनेक समाज हिताचे कार्यक्रम आयोजन करीत गोरगरीबांना मदतीचा हात असल्याने खालापूर प्रेस क्लबच्या कार्याचे सर्वत्र कौतुक असताना 24 सप्टेंबर रोजी या संघटनेच्या माध्यमातून खोपोली शहरात अनोखा कार्यक्रम हाती घेण्यात आले.
शासकीय अधिकारी वर्गाचे कौतुक केले असताना यामध्ये नव्याने रुजू झालेले प्रांताधिकारी अजित नैराळे, तहसिलदार आयुब तांबोळी, खालापूर पोलिस निरिक्षक अनिल विभूते, खोपोली पोलिस निरिक्षक शिरीष पवार, गटविकास अधिकारी बालाजी पुरी, खोपोली मुख्याधिकारी अनुप दुरे, वनअधिकारी राजेंद्र पवार आदी अधिकारी वर्गाचे स्वागत करीत खोपोली नगरपालिका प्रशासनाची मुख्याधिकारी म्हणून अत्यंत जोखमीचे पद यशस्वीपणे सांभाळत खोपोलीकरांच्या मनात त्यांच्या कामाच्या व नियोजनाच्या शैलीने छाप पाडणारे असे उकृष्ट मुख्याधिकारी म्हणून ओळख निर्माण करणारे गणेश शेटे यांना निरोप देत त्याच्या शाळ, पुष्पगुच्छ व श्री गणेशाची मुर्ती यथोचित सत्कार करण्यात आला.

या सत्कारांने गणेश शेटे भावून होत खोपोलीचे रुण कधापी विसरणार नाही याची उपस्थितांना ग्वाही दिली असून माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी नेते दत्ताजी मसुरकर, शिवसेना गटनेते तथा शहरप्रमुख सुनिल पाटील, नगराध्यक्षा सुमन औसरमल, उपनराध्यक्षा विनिता औटीसह, जेष्ठ सल्लागार भाई ओव्हाल व स्वागत मुर्तीनी भाषण करीत खालापूर प्रेस क्लबच्या कार्याचे कौतूक केले असून कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जगदीश मराजगे, प्रास्ताविक प्रशांत गोपाळे, आभार प्रदर्शन मुकुंद बेबडे यांनी केले.
यावेळी प्रांताधिकारी अजित नैराळे यांनी आपले विचार व्यक्त करताना प्रथम खालापूर प्रेस क्लबच्या सर्व सदस्यांचे कौतुक करीत महाराष्ट्र प्रथमच पत्रकारांनी एखाद्या प्रशासकीय अधिकारी वर्गाचा निरोप समारंभ आयोजित केल्याचे पाहायला मिळाले, तर सर्व अधिकारी वर्गाचे गणेश शेटे यांच्या सारखे काम केल्यास त्याच्या निरोप असाच पार पडेल.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी नेते दत्ताजी मसुरकर, शिवसेना गटनेते तथा शहरप्रमुख सुनिल पाटील, खोपोलीच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल, उपनगराध्यक्षा केविना औटी, नगरसेवक किशोर पानसरे आदीसह मोठ्या संख्येने राजकीय – सामाजिक मंडळी व पत्रकार बंधू भगिनी उपस्थित होते.

हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी जेष्ठ सल्लागार भाई ओव्हाळ, प्रवीण जाधव, खालापूर प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत गोपाळे, उपाध्यक्ष एस.टी.पाटील, काशिनाथ जाधव, कार्याध्यक्ष अनिल पाटिल, खजिनदार मुकुंद बेंबडे, सचिव रविंद्र मोरे, प्रसिध्दीप्रमुख समाधान दिसले, सहसचिव राज साळुके, सदस्य नवज्योत पिंगळे, संतोषी म्हात्रे, संतोष गौतार्णे, अतिष खेडेकर आदींनी मेहनत घेतली.







Be First to Comment