खासदार सुनील तटकरे यांच्या कडे इमारत दुरुस्ती निधीसाठी शाळा व्यवस्थापन समितीने केली मागणी
सिटी बेल | याकुब सय्यद | नागोठणे |
एज्युकेशन सोसायटीच्या नादुरुस्त झालेल्या उर्दू हायस्कूल व जुनिअर कॉलेज इमारतीची पाहणी खासदार सुनील तटकरेंकडून आज सकाळी करण्यात आली. यावेळी नागोठणे एज्युकेशन सोसायटीच्या स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने इमारत दुरुस्तीसाठी खर्चाचा अंदाजपत्रकीय प्रस्ताव खा. तटकरेंकडे सादर करून निधीची मागणी केली. इमारत दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासन यावेळी खा. सुनील तटकरे यांनी शाळा व्यवस्थापन समितीला दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय नेते भाई टके, शिवरामभाऊ शिंदे, सदानंद गायकर, मधुकर ठमके, हरीशशेठ काळे, माजी सरपंच रियाजशेठ अधिकारी, डॉ. राजेंद्र धात्रक, विलास चौलकर, नागोठणे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष समदशेठ अधिकारी, सचिव लियाकतशेठ कडवेकर, काँग्रेसचे नेते व सोसायटीचे संचालक शब्बीरशेठ पानसरे, सगीर अधिकारी, डॉ. सादिया दाफेदार, रोहा पं. स. सदस्य बिलाल कुरेशी, काँग्रेसचे युवा नेते सद्दाम फरमान दफेदार, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, शहर अध्यक्ष बाळासाहेब टके, पांडुरंग गायकर, राष्ट्रवादीचे विभागीय अध्यक्ष व पिगोंडे ग्रा. पं. सरपंच संतोषभाई कोळी, हिराजी शिंदे, जुगनशेठ जैन ,विनय गोळे, पप्पूशेठ अधिकारी, अखलाक पानसरे, अलिमभाई मांडलेकर, असिफ अधिकारी, प्रमोद जांबेकर, दिपेंद्र अवाद, दिनेश घाग, मनोज टके, चेतन टके, रोशन पारंगे, रोहिदास हातनोलकर, सिद्धेश काळे, जहुरुद्दीन सय्यद, असद काझी (महाड), उमेर सांगडे, कुणाल तेरडे, केतन गायकवाड, पांडुरंग चौलकर, बिपीन सोष्टे, पप्पू जैन, दिलीप शहासने, उल्हास शिंदे, राजू जांबेकर, धृव सोष्टे, जयेश टके, रमीज फरमान दफेदार, आशिष भालेकर, स्नेहल काळे, प्रतिभा तेरडे, निर्मला रावकर, सुजाता भालेकर, उर्दू प्राथमिक शाळा समिती अध्यक्ष मुजफ्फर कडवेकर, उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक ए. ए. कुणके, लेखनिक अर्षद अधिकारी आदींसह ग्रामस्थ व शिक्षक वर्ग यावेळी उपस्थित होते.
नागोठण्यातील उर्दू हायस्कूल या इमारतीच्या काही वर्ग खोल्यांचा स्लॅब व इतर काही भाग नादुरुस्त झाल्याने स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने रोहा पंचायत समितीचे सदस्य बिलाल कुरेशी यांनी काही दिवसांपूर्वी खा. सुनील तटकरे यांची सुतारवाडी येथे भेट घेऊन नादुरुस्त झालेल्या उर्दू हायस्कूलच्या या इमारतीच्या दुरुस्तीसाठी १२ ते १५ लाख रुपये निधीची मागणी केली होती. बिलाल कुरेशी यांनी सांगितल्यानुसारच आपण या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आल्याचे खा. सुनील तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी पत्रकारांना माहिती देतांना सोसायटीचे सचिव व नागोठण्याचे माजी सरपंच लियाकतशेठ कडवेकर यांनी सांगितले की, १९८८ साली सुरु झालेल्या या शाळेला शासनाची ३५ टक्के अनुदानाची मंजुरी देण्याचे काम खा. सुनील तटकरे यांनी ते राजिपचे अध्यक्ष झाल्यानंतर लगेच केले होते. त्यानंतर राज्य मंत्री मंडळात प्रथमच राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारताच येथील जुनिअर कॉलेजच्या मंजुरीसह सोसायटीच्या खैरे खुर्द व सोगाव (अलिबाग) येथील उर्दू हायस्कूलची मान्यता मिळवून देण्याचे कामही खा. सुनील तटकरे साहेबांनी केले असल्याने नागोठण्यातील इमारतीच्या दुरुस्तीसाठी ते नक्कीच निधी मिळवून देतील असा विश्वास लियाकतशेठ कडवेकर यांनी व्यक्त केला.
यावेळी खा. सुनील तटकरे यांचे नागोठणे एज्युकेशन सोसायटी तसेच पं.स. सदस्य बिलाल कुरेशी यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.







Be First to Comment