Press "Enter" to skip to content

परतीच्या पावसात धुक्याचे सावट ; पहाटेच्या वेळी वातावरणात गारवा

सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |

वातावरण सातत्याने बदल घडत असल्यामुळे मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होत असून नागरिक चांगलेच हैराण झाले आहे.पहाटे धुके मोठ्या प्रमाणात पडत असले तरी सुद्धा सायंकाळी आकाशात ढग दाटून येत आहे.यामुळे हा पावसाळा म्हणावे की उन्हाळा म्हणावे का हिवाळा अशिच स्थिती बळीराजाची झाली आहे.भात शेती उत्तम बहरली असून काही ठिकाणी धरतीवर सोनेरी शाळ परिधान केलीली जाणवू लागले आहे.मात्र सायंकाळी होताच बळीराजाच्या तोंडचे पाणी पळत आहे.

सकाळी जरी वातावरणात धुके पडत असले तरी सुद्धा गुलाबी थंडी जाणवत नाही.मात्र धुक्यामुळे वाट काढले वाहनचाकांस अवघड जात आहे. सायंकाळी अकाशात ढग निर्माण होवून पाऊस पडत असल्यामुळे शेतात तयार झाले धान्य या पावसामुळे नुकसान होण्याच्या मार्गावर असतान शेतकरी चांगलाच धास्तावले आहे.

भाताच्या लोंब्या मध्ये दाणा तयार होण्याच्या मार्गावर असून लोंब्यातील दाणा अलग होत आहे.भात कापणी करण्यास आजून भात कापण्यास तयार झाली नसून परतीच्या पावसामुळे भात शेती पडत आहे. पाऊस पडलातर हाताला भाताचा दाणा मिळणार नाही.या विचारांतून बळीराजा मोठ्या संकटात सापटले आहे.दर वर्षी हस्त नक्षत्रांचा पाउस शेतीचे नुकसान करीत असल्यामुळे शेती करण्यासाठी बळीराजा पाठ फिरवत आहे. मात्र आपला उदार निर्वाह शेतीवरच असल्यामुळे शेती शिवाय पर्याय नाही.पाऊस शांत झाला असता तर भात कापणींस पारंभ झाला असता,मात्र सायंकाळी येत असलेल्या पावसामुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.