आदिवासी आश्रम शाळा कारव येथे आदिवासी विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेला प्रवेश मिळावे संघटनेची मागणी
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
आदिवासी आश्रम शाळा कारव येथे आदिवासी विद्यार्थ्यांना विज्ञान शाखाला प्रवेश मिळावे अशी मागणी ठाकूर समाज संघटनेच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून केली जात आहे.
रायगड जिल्हा व ठाणे जिल्हा ठाकूर समाज संघटनेच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षापासून उल्हास परिसर प्रतिष्ठान काराव तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे येथे असलेल्या आदिवासी आश्रम शाळा कारव येथे आदिवासी विद्यार्थ्यांना विज्ञान शाखाला प्रवेश मिळावे म्हणून आदिवासी समाज संघटनेच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले यावेळी रायगड जिल्हा ठाकूर समाज संघटनेचे अध्यक्ष मालू निरगुडे, ठाणे जिल्हा आदिवासी समाज संघटनेचे अध्यक्ष संतोष भगत, ठाणे जिल्हा परिषदेच्या माजी समाज कल्याण सभापती नंदा उघडा, मुरबाड पंचायत समिती उपसभापती अरुणा खाकर, पंचायत समितीच्या सदस्या विजया वाघ, लोक सेवा संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ खाकर, मुरबाड आदिवासी संघटनेचे अध्यक्ष अनिल कवटे, कर्जत तालुका संघटनेचे उपाध्यक्ष परशुराम दरवडा, मंगल केवारी, सामाजिक कार्यकर्ते रमेश उघडा, आदिवासी विकास परिषद जिल्हा ठाणे सचिव विलास हिंदोळे, नोकरवर्ग मुरबाड तालुका अध्यक्ष काशीनाथ शिंगवा, श्री महाराष्ट्र राज्य संघटनेचे सदस्य काशिनाथ पादिर, पनवेलचे पांडुरंग पारधी, सरपंच गणेश पारधी आदी उपस्थित होते.
तब्बल 17 वेळा संस्थेला व मुख्याध्यापक यांना विनवण्या केल्या तसेच शासन स्तरावर पाठपुरावा करून शासनातर्फे 3 वेळा आदेश पारित होऊन सुद्धा मुजोर संस्था चालक व त्यांचे संचालक मंडळ आणि मुख्याध्यापक हे जाणीवपूर्वक संगनमताने आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच सारख्या मुलभूत अधिकारापासून वंचित ठेवण्याचे जे काय कटकारस्थाने केले आहेत ते भारतीय संविधानाच्या कलम 21क आणि 40 या कलमानुसार संस्थाचालक व त्यांचे संचालक मंडळ आणि मुख्याध्यापक यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 च्या कायद्यान्वये त्यांचेवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी रायगड जिल्हा आणि ठाणे जिल्ह्यातील आदिवासी संघटनांनी एकत्र येऊन जोरदार मागणी केली आहे.
तसा गुन्हा नोंदवण्यासाठी तक्रार अर्ज ठाणे जिल्ह्या ग्रामीण विभागाचे डी वाय एस पी मुरबाड तसेच स्थानिक पोलीस ठाणे बदलापूर यांच्याकडे तक्रार केली आहे सदरच्या प्रकरणाची योग्य ती कारवाई न झाल्यास रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील आदिवासी समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा देण्यात आला आहे. सदरच्या मागणीसाठी व गुन्हा दाखल करण्यासाठी असे रायगड जिल्हा ठाकूर समाज संघटनेचे अध्यक्ष मालू निरगुडे यांनी सांगितले.







Be First to Comment