Press "Enter" to skip to content

कृषी कायद्यांविरोधात भारत बंद ! रोहा तालुक्यात सर्वहारा जनआंदोलन संघटनेची निदर्शने

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |

देशातील केंद्र सरकार व मोदी सरकारचे शेतीविरोधी कायदे व चार कामगार श्रम संहीता या विरोधात आज सोमवार २७ सप्टेंबर रोजी पुकारलेल्या भारत बंद व दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठींबा म्हणून सर्वहारा जन आंदोलन संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष सोपान सुतार यांच्या नेतृत्वाखाली रोहा तालुक्यातील पाथरशेत आदिवासी वाडी ता,रोहा जि,रायगड येथे गावात मिरवणूक काढून व निदर्शणे करून भारत बंद व दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठींबा असल्याचे सदरील निदर्शन करण्यात आले असून याला उत्स्फुर्त असा प्रतिसाद दिसून आले.

यावेळी तालुक्यातील विविध भागांतील धामणसई ,खातेली वाडी व दिव ता,रोहा या ठिकाणी मोठी निदर्शने करत अशा प्रकारचे आंदोलन करण्यात येऊन वस्ती वाड्यांवर प्रभात फेरी द्वारे व बॅनरच्या माध्यमातून केंद्र सरकार व मोदी सरकारने कामगार विरोधात व तीन कृषी कायदे आणले आहेत ते शेतकरी कष्टकऱ्यांना घातक असल्याने ते सरकारने रद्द करावेत व ते चालणार देखील नाहीत यासाठी हे आंदोलन व निदर्शने रोहा तालुक्यासह महाजने- अलिबाग,बेलेवाडी- मुरूड,
तासगांव- माणगांव, निजामपूर , पालसगाव खर्डी येथे ही हे आंदोलने करण्यात आले.

यावेळी सर्वहारा जनआंदोलन संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष अध्यक्ष- सोपान सुतार, यांच्या नेतृत्वाखाली कार्याध्यक्ष- चंद्रकात गायकवाड,सचिव- अंकुश वाघमारे,चंदा तिवारी,उमेश ढुमणे, यमुना वाघमारे,नथुराम वाघमारे,रघुनाथ नाईक,यांच्या उपस्थित हे आंदोलन करण्यात आले असून यात तालुक्यांतील वाड्यांवस्त्यांवरील शेतकरी व कष्टकरी नागरिक व महिला वर्ग सर्वहारा जनआंदोलन संघटनेचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.