Press "Enter" to skip to content

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागोठणे विभागातील विविध पदाधिका-यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेस नागोठणे शहर अध्यक्षपदी बाळासाहेब टके, जि. प. गट अध्यक्षपदी संतोषभाई कोळी

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकारणीची सभा रायगडचे कर्तव्यदक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच पालकमंत्री अदितीताई तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस नागोठणे शहर अध्यक्षपदी पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते बाळासाहेब टके व नागोठणे जिल्हा परिषद गट अध्यक्षपदी पिगोंडे ग्रामपंचायतीचे सरपंच संतोषभाई कोळी यांची निवड करण्यात आली आहे.

या निवडीसह नागोठणे शहर व विभागातील विविध पदाधिका-यांची निवडही यावेळी करण्यात आली. या कार्यक्रमास राष्ट्वादीचे प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील, रोहा तालुका अध्यक्ष विनोदभाऊ पाशिलकर, भाई टके, शिवरामभाऊ शिंदे, नंदूशेठ म्हात्रे, सुरेश मगर, विलास चौलकर, रामचंद्र सकपाळ, युवक तालुका अध्यक्ष जयवंत मुंडे, प्रकाशशेठ जैन, अनिलशेठ काळे, बाळासाहेब टके, सुनिल लाड, संतोषभाई कोळी, सचिन कळसकर, विनायक गोळे, पप्पूशेठ अधिकारी, निवास पवार, दिपेंद्र अवाद, विक्रांत घासे, प्रमोद जांबेकर, चेतन टके, दिनेश घाग, तालुका विद्यार्थी अध्यक्ष अक्षय नागोठणेकर, धृव सोष्टे, कुणाल तेरडे, रवि वाजे, केतन भोय, करण लाड, सुजाता जवके, प्रतिभा तेरडे, रिचा धात्रक, निष्ठा विचारे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारणी सभेच्या वेळी रोहा तालुका उपाध्यक्षपदी चंद्रकांत गायकवाड, ऐनघर पं. स. गण अध्यक्षपदी सुनिल सुटे, नागोठणे पं. स. गण अध्यक्षपदी विक्रांत घासे, युवक राष्ट्रवादी नागोठणे शहर अध्यक्षपदी कुणाल तेरडे, महिला आघाडी रोहा तालुका उपाध्यक्षपदी कल्पना टके, तालुका उपाध्यक्षपदी रिचा धात्रक, तालुका उपाध्यक्षपदी निष्ठा विचारे, तालुका कार्यकारणी सदस्यपदी नंदाताई गायकवाड, नागोठणे जि. प. गट महिला अध्यक्षपदी स्नेहल काळे, नागोठणे पं. स. गण अध्यक्षपदी मिनाक्षी जांबेकर, नागोठणे शहर अध्यक्षपदी सुजाता जवके, शहर उपाध्यक्षपदी प्रतिभा तेरडे, पळस प्रभाग अध्यक्षपदी परिक्षा घासे आदी पदाधिका-यांची निवड करण्यात आली. दरम्यान सर्व पदाधिका-यांवर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.