Press "Enter" to skip to content

महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली पेण शहर काँग्रेसमय करणार – प्रवीण पाटील

सिटी बेल | पेण | वार्ताहर |

काॅग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या पेण मध्ये मध्यांतरी पक्षाची वाईट स्थिती झाली असल्याने अनेकांनी पक्ष संपला म्हणून वल्गन्या केल्या मात्र आता काॅग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाची ताकद आम्हा कार्यकर्त्यांना मिळाली असल्याने येत्या काळात पेण तालुक्यासह शहर काँग्रेसमय करणार असल्याचे प्रतिपादन शहर अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी केले आहे.

नुकतेच जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचा भव्यदिव्य असा जाहिर सत्कार पेण येथील महात्मा गांधी वाचनालय येथे करण्यात आला.यावेळी पुढे बोलतांना प्रवीण पाटील म्हणाले की, या दोन वर्षांपासून देशात कोरोनाचे महाभयंकर असे संकट उभे राहिले आहे.या कोरोना लाॅकडाऊनमध्ये आपण स्वता अनेक गरीब गरजूंना मदत केली आहे त्यामुळे काॅग्रेस पक्षाची ध्येयधोरणे हीच आहेत की सर्वसामान्य माणसांमध्ये परिवर्तन घडले पाहिजे त्यामुळे आता तरूणांसह सर्वसामान्य माणूस हट्टाला पेटला असल्याने येणारे सरकार हे कॉंग्रेसचे असणार असे सांगून आता जिल्हाध्यक्ष यांच्या रुपात पक्षाला नवसंजीवनी मिळाली असल्याने पेण शहरात आपण काॅग्रेस वाढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जेष्ठ नेते बापुसाहेब नेने, ॲड.जे.टी.पाटील, महिला जिल्हाध्यक्षा ॲड.श्रद्धा ठाकूर, सरचिटणीस चंद्रकांत पाटील, नंदा म्हात्रे, अशोक मोकल, माजी सभापती सदानंद म्हात्रे, निलेश म्हात्रे, अविनाश भोईर आदिंसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी शहर अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या स्वागतार्थ कार्यकर्त्यांनी पेण शहरातून उत्स्फूर्तपणे बाईक रॅली काढून संपूर्ण पेण शहर काँग्रेसमय केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.