सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
माथेरान पालिकेवर पुन्हा भगवाच फडकणार असा विश्वास शिवसेनेचे खासदार तसेच माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी माथेरान मध्ये कामगार मेळाव्यात बोलताना व्यक्त केला. यावेळी त्यांच्या हस्ते कामगार सेनेच्या नाम फलकाचे अनावरण करण्यात आले.
भाजपा वर निशाणा साधत तसेच सेनेतुन भाजपा मध्ये गेलेल्या माथेरानच्या नगरसेकांवर त्यांनी टीका केली. या पुढील सत्ता देखील माथेरान मध्ये सेनेचीच असेल उद्धव ठाकरे यांच ते सप्न आहे असे ते म्हणाले.
व्यासपीठावर माथेरान नगराध्यक्ष प्रेरणा सावंत, गटनेते प्रसाद सावंत, शहर प्रमुख चंद्रकांत चोधरी, महिला आघाडी शहर संघटक संगिता जांभळे, माजी नगराध्यक्ष विवेक चौधरी, शिवसेनेचे नेते भरत भगत, तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, वनसमितीचे योगेश जाधव उपस्थित होते.
या कार्यक्रमात माथेरान मधील अनेक तरूणांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी कामगार सेनेच्या पदाधिका-यांची निवङ करण्यात आली. अध्यक्षपदी रत्नदिप प्रधान तर उपाध्यक्षपदी सागर पाटील, सचिन पाटील, सचिव पदी अनिल नाईकङे तर कार्याध्यक्ष अवदुत यरफुल्ले यांची निवड करण्यात आली.
गटनेते प्रसाद सावंत यांचा वाढदिवस असल्याने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. कार्यकमांचे सुत्रसंचालन योगेश जाधव यांनी केले तर शिवसेनेचे नगसेवक तथा बांधकाम सभापती प्रसाद सावंत यांनी आभार मानले.







Be First to Comment