Press "Enter" to skip to content

तीन काळे कायदे, देशाची संपत्ती विकण्याच्या घाट विरोधात कर्जत काँग्रेसचे आंदोलन

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

केंद्रातील मोदी सरकारने शेतकरी विरोधी तीन काळे कायदे केले. तसेच या सरकारने देशाची संपत्ती विकण्याचा घाट घातला आहे. खाजगीकरणाचा सपाट लावला आहे. 2 कोटी रोजगार देण्याचा विसर पडलेल्या केंद्र सरकारचा कर्जत काँग्रेसच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या आदेशानुसार देशातील विविध समस्यामध्ये शेतकरी विरोधी तीन काळे कायदे, रेल्वे, बँका, विमानसेवा, रस्ते, विमाकंपन्या, सार्वजनिक उदयोग, दुरसंचार आणि बंदरे. अश्या प्रकारे मोदी सरकारने देशाची संपत्ती विकण्याचा घाट घालुन. खाजगीकरण करणे तसेच तरुणांना 2 कोटी रोजगार देण्याचे आश्वासन संपुष्टात आणले आहे. तसेच वाढती महागाई विरोधात, पेट्रोल, डिझेल, गॅस, दरवाढी विरोधात लोकभावना लक्षात घेता. कर्जत काँग्रेसच्या वतीने तालुका अध्यक्ष मुकेश सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सोमवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी येथील टिळक चौकात केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन केले.

या प्रसंगी माजी शहर अध्यक्ष विजय हरिश्चद्रे, मुकेश सुर्वे यांनी केंद्र सरकारच्या विरोधात विचार व्यक्त केले. यावेळी मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. धिक्कार केला. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष धंनजय चाचड, मनोहर कदम, अल्पसंख्यांक तालुका उपाध्यक्ष आवेश जुवारी, , जिल्हा सचिव इस्माईल दिवाण, शहराध्यक्ष इरफान अत्तार, सुभाष मदन, दिनेश रावळ, अनंत देवळे, मंगल माळी, देविदास ऐनकर आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.