सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत नगरपरिषद हद्दीतील विकास कामांना एमएमआरडीए च्या निधीतून 28 कोटी 33 लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, याबद्दल नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी खासदार श्रीरंग बारणे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून त्यांचे आभार मानले आहेत.

कर्जत नगरपरिषद क वर्गाची नगरपरिषद असल्याने नगर परिषद क्षेत्रात विकास कामांना निधी कमी पडत असतो, सदर विकास कामांना एमएमआरडीएच्या माध्यमातून निधी मिळावा यासाठी कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची वेळोवेळी यांची भेट घेवून कर्जत नगरपरिषदेचे क्षेत्रातील प्रस्ताव सादर केले होते, या प्रस्तावास नगर विकास विभागाच्या कडून कर्जत नगरपरिषद क्षेत्रात 28 कोटी 33 लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
मावळचे खासदार श्रीरंग बारणे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या कार्यालय जाऊन प्रत्यक्ष भेट घेवून नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी त्यांचे मनापासून आभार मानले याप्रसंगी त्यांच्या समवेत युवा सेना पदाधिकारी मयूर (बंटी) जोशी, केतन जोशी उपस्थित होते.







Be First to Comment