सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
रोहे तालुक्यातील नडवली गावचा सुपुत्र व सर्पमित्र म्हणून विशेष ओळख असणाऱ्या अजय भोसले याने आठ फुट लांबीच्या नागास सुरक्षितपणे पकडून जीवदान दिले आहे.
धाटाव औद्योगिक वसाहतीतील निलिकाँन कंपनीत एका गोडाऊन बाजूस सर्प शिरला असल्याची माहिती मिळताच अजय भोसले याने तिथे जाऊन अत्यंत अडचणीच्या ठिकाणी शिरलेल्या व अत्यंत विषारी असलेल्या आठ फुटी सर्पास मोठ्या शिताफीने पकडून जीवदान दिले आहे.

सर्पमित्र अजय याने विषारी सर्पास मोठ्या शिताफीने पकडल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.तत्पूर्वी सापाबद्दल उलट सुलट चांगलीच चर्चा रंगात आली होती.आठ फुटी लांबीच्या विषारी सर्पास अजयने मोठ्या कौशल्याने पकडून अजय सर्वांना चांगलेच आश्चर्यचकित केल्याने त्याच्या या धाडसाचे सर्वत्र कौतूक होताना दिसत आहे.तर याकामी सर्पमित्र
अजय भोसले यास त्याचा मित्र अजय राजिवले याचेही मोलाचे असे सहकार्य लाभले असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान सर्पमित्र अजय भोसले याने आतापर्यंत शेकडो विषारी व बिनविषारी सापांना सुरक्षितरित्या पकडून त्यांना जीवदान दिले आहे.







Be First to Comment