Press "Enter" to skip to content

वावेघर येथे रस्ता कॉक्रिटीकरण विकासकामाचे भूमिपूजन

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

वावेघर ग्रामपंचायत हद्दीत राजिप शाळेपासूनचा रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने सदर रस्ता काँक्रीटीकरणाचा व्हावा यासाठी ज्ञानेश्वर माळी यांनी माजी आमदार मनोहर भोईर यांच्याकडे मागणी केली होती.या मागणीनुसार वावेघर हद्दीतील रस्त्याच्या विकास कामाचे भूमीपुजन मा.आमदार तथा शिवसेना जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

वावेघर गावातील हे काम जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ अंतर्गत जन सुविधा निधीमधून रस्ता कॉक्रिटीकरणाचे काम मंजूर करण्यात आले आहे.यावेळी राजिप वावेघर शाळेत आभारप्रदर्शनाचा कार्यक्रम पार पडला.यावेळी मा.आमदार मनोहर भोईर यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मा.आमदार मनोहर भोईर यांनी आपल्या मनोगतात सांगितले कि, मी आमदार असताना संपूर्ण उरण विधानसभा मतदारसंघामध्ये पाच वर्षामध्ये ज्याप्रकारे विकास कामे केली. त्याचप्रमाणे आतादेखील आपल्या महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकासकामे मंजूर करुन शिवसैनिकांनी आपल्या प्रभागातील करावयाची असलेली विकास कामे विभागप्रमुख,तालुका प्रमुखांकडे अथवा आमच्या पर्यत सांगून पुर्ण आत्मविश्वासाने आपल्या मागणीला शिवसेना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही.असा प्रबल आत्मविश्वास कार्यकर्त्यांना देऊन आपण सर्वच नव्या उमेंदीने संघटनेचे यशस्वी काम करत आहोत. शिवसेनेचे सर्व मावळ्यांच्या ताकदीने आपण पुन्हा एकदा उरण विधानसभेवर भगवा झेंडा फडकवल्याशिवाय शांत बसणार नाही असे सांगितले.मला उरण विधानसभा मतदारसंघात फक्त विकासकामे करायची आहेत असे ते उपस्थितांना म्हणाले.

यावेळी पनवेल तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील, तालुकासंपर्कप्रमुख अनंता पाटील, उपतालुकासंघटक सुधीर पाटील, मनोज पाटील-उरण,वावेघर विभागप्रमुख ज्ञानेश्वर माळी, उपविभागप्रमुख भरत राउत, समाजसेवक महेंद्र गायकर, माजी सरपंच मनोज भंडारकर, उपसरपंच श्रुती ज्ञानेश्वर माळी, ग्रा.पं.सदस्य अविनाश गव्हाणकर, गुळसुंदे शाखाप्रमुख प्रथमेश पाटील, जाताडे शाखाप्रमुख महेंद्र गायकर, ग्रा.पं.सदस्य अमित माळी, ग्रा.पं.सदस्य गुरुनाथ माळी, ग्रा.पं.सदस्य दिपक राठोड, ग्रा.पं.सदस्य दिपक मढवी, ग्रा.पं.सदस्य समृद्धी भगत, युवासेना अधिकारी प्रमोद गोळे, युवासेना उपअधिकारी महेश वाकडीकर आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.