Press "Enter" to skip to content

छावा क्रांतीवीर सेनेच्या रायगड जिल्हा पदनियुक्ती जाहीर

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करन गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली व रोशन पवार रायगड जिल्हा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वी सभेचे आयोजन करण्यात आले .

सभेला स्वप्नील घरत संपर्कप्रमुख रायगड जिल्हा, राजेश रसाळ संघटक रायगड जिल्हा,शैलेश कोंडसकर प्रमुख वक्ते रायगड जिल्हा,जितेंद्र ठाकूर
पेण तालुका अध्यक्ष अभिजित मोकल , उरण तालुका अध्यक्ष,सुरेश जाधव खालापूर तालुका अध्यक्ष,दिलीप साळवी प्रमुख सल्लागार पेण तालुका, दीपक संसारे पेण शहर प्रमुख,दिपाली ठाकूर व राजश्री ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी नविन नियुक्त्या करण्यात आल्या त्या पुढीलप्रमाणे :
संजय तांडेल उरण तालुका उपाध्यक्ष , सोमनाथ माने उरण तालुका संपर्कप्रमुख, सागर म्हात्रे उरण तालुका सचिव,शेखर जोशी उरण शहर उपाध्यक्ष,नरेंद्र मोकल पनवेल तालुका कर्नाळा विभाग अध्यक्ष,रोशन देशमुख पनवेल तालुका उलवे विभाग अध्यक्ष, भानुदास जांभळे खालापूर तालुका रसायनी विभाग अध्यक्ष,अनिल पाटील तामसी बंदर शाखा अध्यक्ष पेण,दिलीप माळी पेण तालुका सचिव,समाधान म्हात्रे पेण शहर उपाध्यक्ष,अक्षय कुथे पेण वडगाव विभाग अध्यक्ष,राजेंद्र ठाकूर पेण फणस डोंगरी विभाग अध्यक्ष,अंकुश वाघमारे वडखळ – नागोठणे विभाग अध्यक्ष,प्रकाश पांडुरंग ठाकूर खार ठोंबी शाखा प्रमुख,विष्णू मधुकर वाघमारे सुळेवाडी शाखा प्रमुख,काळुराम लखु पवार नंबर वाडी शाखा प्रमुख,बबन कमलाकर वाघमारे रोडेवडी शाखा प्रमुख,श्रावण जणू वाघमारे सुलेवाडी पेण शाखा प्रमुख या सर्वांना छावा क्रांतीवीर सेनेची नवीन पदे वाटप करण्यात आली.

सोबत सर्व नवीन व जुने पदाधिकारी यांना पुन्हा एकदा संघटनेची तत्त्व सांगितली तसेच आज पर्यंत रायगड जिल्हा संघटनेची विजयी घोडदौड सर्वांसमोर विस्ताराने सांगितली गेली.सोबतच संघटनेची पुढील रणनीती ठरवण्यात आली,जसे की स्थानिकांना रोजगार, महिला बचत गट सक्षमीकरण, युवांसाठी क्रिकेट, व्यावसायिकांसाठी नविन व्यवसायासाठी लवकरच मार्गदर्शन शिबीर संघटनेच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.तसेच संपुर्ण रायगड जिल्ह्यात गाव तेथे शाखा यांचेही नियोजन करण्यात आले.भविष्यात येणाऱ्या काही दिवसात संपुर्ण रायगड जिल्हा मा.करणभाऊ गायकर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली छावा क्रांतिवीर सेनामय करणार आहोत.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश रसाळ यांनी सुंदररित्या केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.