Press "Enter" to skip to content

चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्मा दिन साधेपणाने साजरा

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

देशाच्या स्वातंत्र्यासाठी उरण तालुक्यातील चिरनेर येथे शनिवार दि. 25 सप्टेंबर 1930 रोजी आक्कादेवीच्या माळरानावर
झालेल्या गौरवशाली व शौर्यशाली लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीर हुतात्मा स्मूतीदिन साधेपणाने साजरा करण्यात आला.

यावेळी माजी आमदार व जिल्हाप्रमुख मनोहर्षेथ भोईर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, साई संस्थान वहाळचे सर्वेसर्वा रविशेठ पाटील, तालुका प्रमुख संतोष ठाकूर, जीप सदस्य बाजीराव परदेशी, उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, सभापती समिधा म्हात्रे, उपसभापती शुभांगी पाटील, माजी सभापती भास्कर मोकल, गटविकास अधिकारी नीलम गाडे, जेष्ठ पत्रकार धननजय गोंधळी, सुरेश पाटील, किरीट पाटील, सरपंच संतोष चिर्लेकर, सदस्य व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी रणसंग्रामात धाकू गवत्या फोफेकर ,नाग्या महादू कातकरी दोघेही – चिरनेर,आलू बेमट्या म्हात्रे – दिघोडे,आनंदा माया पाटील – धाकटी जुई,रामा बामा कोळी – मोठीजुई, मोरेश्वर रघुनाथ शिंदे(न्हावी) – कोप्रोली,परशुराम रामा पाटील – पाणदिवे व हसुराम बुद्धाजी घरत – खोपटे या आठ शूरविरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात आक्कादेवीच्या माळरानावर जंगल सत्याग्रह केला.

दरवर्षी चिरनेर येथे रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि चिरनेर ग्रामपंचायतीच्या वतीने हुतात्म्यांच्या नातेवाईकांचा व स्वातंत्र्य सैनिक आणि जखमींच्या नातेवाईकांचा यथोचित सत्कार व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात येतो.मात्र यंदाही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात असला तरी शासनाच्या निर्बंधांचे पालन करीत अधिक गर्दी न करता हुतात्मा स्तंभ आणि शिलालेख यांनी पुष्पचक्र आणि पुष्पहार अर्पण करून पोलिसांची शासकीय सलामी अशा अवघ्या काही अवधीत हा कार्यक्रम कोणत्याही प्रकारे गाजावाजा न करता थोडक्यात आटोपण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहण्यात आले. तसेच पोलिसांनी हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.