Press "Enter" to skip to content

खालापूर येथे लोकअदालत,११४३ प्रकरणे निकाली तर १२०२७६९४ ₹ दंड वसूल

सिटी बेल| रसायनी | राकेश खराडे |

खालापूर दिवाणी न्यायालय येथे लोक अदालत आयोजित करण्यात आली होती, त्यात ११४३ प्रकरणाचा कायम निकाल करून १२०२७६९४ ₹ रूपयांची दंड वसुली करण्यात आली.
खालापूर येथे दिवाणी न्यायालय कनिष्ठस्तर येथे राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली होती.

सदर राष्ट्रीय लोक अदालत मध्ये दिवाणी,फौजदारी, वादपूर्व प्रकरणे व गुन्हा कबुलीही अशी एकूण ४२९९ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ११४३ प्रकरणे निकालात काढून १२०२७६९४ ₹ एवढी वसुली करण्यात आली.

पंच म्हणून दिवाणी न्यायाधीश आर. डी.बावले, सह. दिवाणी न्यायाधीश पी.एम.माने,सह. न्यायाधीश श्रीमती एल.के. सपकाळ, सचिव तथा विस्तार अधिकारी शैलेंद्र तांडेल यांनी काम पाहिले.वकील वर्गा कडून सिद्धेश जितेकर, स्वाती म्हात्रे,पी.एल. व्ही. अधिकारी संजय सांगलें, मिलिंद पारठे तर सरकारी वकील कल्पना फोंडके, सह अधीक्षक सुभद्रा चव्हाण यांनी कामकाज पाहिले.एकूण वसुली पैकी ग्रामपंचायत घरपट्टी ७३८३३६६ ₹ व पाणीपट्टी ५७४५४० ₹ एवढी वसूल करण्यात ग्रामपंचायत विभाग यशस्वी झाला तर उर्वरित खोपोली नगरपालिका व खालापूर नगरपंचायत यांची वसुली झाली.

वकील मिलींद सुरावकर, सचिन चाळके,व्ही. टी.म्हात्रे,दांडगे,शहनवाज खान,मयूर कांबळे,योगेश मानकवळे, आरती गुप्ता,सरिता वाघमारे व अन्य वकील तसेच न्यायालयातील सर्व कर्मचारी उपस्थित राहून कामकाज सुरळीत पार पाडले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.