सुप्रीम कोर्टाची स्थगिती असताना देखील अदानी कंपनीने सुरू ठेवले काम
सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |
आगरदांडा येथील अदानी पोर्टच्या कामात स्थानिकांना डावलने, स्थानिक ठेकेदारांची देणी थकवणे, वर्कऑर्डर देऊनही गाड्या बंद करण्यात देण्यात आलेली नोटीस तसेच सुप्रीम कोर्टाची स्थगिती असतानादेखील कंपनीने काम सुरु ठेवल्याने स्थानिकांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे.
स्थानिकांनी रोजगारासाठी बँकेचे कर्ज काढून बस, इनोव्हा, बोलेरो, पीक अप गाड्या लावल्या आहेत. कंपनीने अशा गाड्यांना एक वर्षाची वर्कऑर्डर देऊनही गाड्या बंद करण्यात अदानी पोर्ट तर्फे नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालक व मालकांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिकांना प्रशिक्षण व रोजगार मिळावा यासाठी अलिबाग-मुरुड मतदार संघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी ग्रामस्थांसह अदानीपोर्टचे एच.आर. कॅप्टन लोबो यांची भेट घेऊन कंपनीचे काम बंद करण्यात भाग पाडले.

आगरदांडा येथील दिघी अदानी पोर्टच्या कामाला सुरुवात झाली. मात्र या कामात स्थानिकांना डावलून बाहेरील ठेकेदाराला काम दिले जाते, मागील दिघी पोर्टच्या कामात डी.बी.एम.व डी.पी.एल. कंपनीकडून अद्यापही काही ठेकेदारांची येणे बाकी आहे. सुप्रीम कोर्टाची स्थगिती असताना देखील कंपनीचे काम सुरू आहे.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख ऋषिकांत डोंगरीकर, उपतालुकाप्रमुख मनोज कमाने, महिला संघटक शुभांगी करडे, मुरुड नगराध्यक्षा स्नेहा पाटील, ग्रामपंचायत सरपंच रुषाली डोंगरीकर, कोअर कमिटी सदस्य, पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.







Be First to Comment