सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत मधील प्रतिक जूईकर हा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात 177 वा आला असून कर्जत तालुक्यातून तसेच रायगड जिल्ह्यातून यू पी एस सी परीक्षा पास होणारा तो पहिला ठरला आहे. त्यांचा कर्जत विधानसभाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी त्याचा सत्कार केला.
कर्जत नगरपरिषद हद्दीतील मुद्रे येथे राहणारे चंद्रशेखर जूईकर यांचा प्रतिक हा मुलगा आहे. चंद्रशेखर जूईकर हे कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये प्राथमिक शिक्षक आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत ही प्रतिक हा पहिला आलेला होता. अभ्यासाची आवड असल्याने त्याने नोकरी करत केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देवून आई वडिलांचे आयए एस होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. देशात 177 व्या क्रमांकाने तो उतिर्ण झाला आहे. त्याच्या या यशाने कर्जतकरांची तसेच जिल्ह्याची मान उंचावली आहे.

आमदार महेंद्र थोरवे यांनी मुद्रे येथे प्रतिक याच्या निवासस्थानी जाऊन त्याला शाल व श्रीफळ देऊन त्याचा सत्कार केला तसेच त्याला पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी त्याच्या समवेत शिवसेना जिल्हा महिला संघटक रेखा ठाकरे, तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, पंकज पाटील, नगरसेवक ॲड.संकेत भासे, भीम मुसळे आदी उपस्थित होते.







Be First to Comment