Press "Enter" to skip to content

गणेगाव येथील गंजलेले विजेचे 8 पोल महावितरण ने बदलले

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत नसरापूर हद्दीतील मौजे गणेगाव येथील गंजलेले,खराब झालेले विजजेचे पोल महावितरण कंपनीने बदलले आहेत.

प्रत्येक गावात , शहरात विज वितरण कंपनीचे विज वाहक पोल गंजलेले आहेत, ते पोल कधीही पडून अपघात होण्याची शक्यता असते , बरेच पोल हे वीज वाहक ताराच्या आधारावर उभे असल्याचे चित्र सगळीकडेच दिसत असते, युवासेना चे कर्जत तालुका सचिव अ‍ॅड.संपत पांडुरंग हडप हे सातत्याने यासाठी पाठपुरावा करत होते.अखेर त्याला यश आले. ग्रुप ग्रामपंचायत नसरापूर हद्दीतील मौजे गणेगाव येथील खराब झालेले विजेचे 8 पोल महावितरण कडाव विभागाचे सहाय्यक अभियंता रितेश साबदे यांनी त्वरित बदलण्याचे काम हाती घेतले.

खराब पोल बदलाचे काम सुरू असताना

गणेगाव येथील खराब झालेल्या वीज खांब बदलण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करून गावातील खूप मोठी अडचण दूर केली काही दिवसात चिंचवली गाव येथील खराब झालेले वीज खांब आणि दोन्ही गावातील वाढत्या वसाहती मधील अडचणीच्या भागातील विजखांब बसविण्याचे काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन साबदे यांनी अ‍ॅड.संपत पांडुरंग हडप यांना दिले आहे.

कामासाठी गावातील तरुणांनी देखील मदत केली नथुराम देशमुख, धनाजी थोरवे, महेंद्र आंबेकर, कैलास थोरवे, सचिन हडप, प्रसाद कर्णूक, अक्षय तिखंडे, अतुल हडप, वैभव देशमुख, सुशांत मोहिते, शुभम राऊत, धनेश हडप, प्रथमेश देशमुख,रोहित हडप, शिवम हडप, यश हडप या तरुणांनी मदत केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.