Press "Enter" to skip to content

जांभिवलीत उघड्यावरील सांडपाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका

ग्रामपंचायतीला वैभव कोंडिलकर यांचे निवेदन

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

रसायनी पाताळगंगा अतिरिक्त एमआयडीसीतील जांभिवली ग्रामपंचायत हद्दीतील जांभिवली गावातील सांडपाणी गटारातून आलेल्या दुषित पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने सदर सांडपाणी जांभिवली गावातील मरिआई मंदिर परिसरात साचल्याने दुषित सांडपाण्यामुळे दुर्गंधी येत आहे.यामुळे आसपासच्या नागरिकांना तसेच दर्शंनासाठी मरिआई मंदिरात येण्याजाणा-या भाविकांना त्रास होत आहे.येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याने परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.तसेच जांभिवली गावातील शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरही सांडपाणी साचत असल्याने शिवप्रेमीत नाराजीचा सूर उमटत आहे.

सदर समस्या सोडविण्यासाठी जांभिवली शिवसेना शाखाप्रमुख वैभव देवराम कोंडिलकर , उपशाखा प्रमुख समीर कोडिंलकर, सरचिटणीस महेश टकले, शिवसैनिक बाळकृष्ण कोंडिलकर तसेच शिवप्रेमी ग्रामस्थ यांनी जांभिवली ग्रामपंचायतीला निवेदन देऊन जांभिवली गावातील सांडपाण्याची समस्या नवरात्री उत्सवापर्यंत न सुटल्यास परिसरातील शिवसैनिक रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.