Press "Enter" to skip to content

सामाजिक कार्येकर्ते संजय आंबेतकर यांचे दु:खद निधन

सिटी बेल | खांब-रोहे | प्रतिनिधी |

वहूर महाड येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय चंद्रकांत आंबेतकर यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.

संजय आंबेतकर यांनी हिंदूस्थान पेट्रोलियम काँरपोरेशन लि.मुंबई येथे आपला सेवाकाळ पुर्ण करून नुकतेच २०१८ साली सन्मानाने सेवानिवृत्त झाले होते.त्यांनी आपल्या सुस्वभावी व्यक्तिमत्त्वामुळे सेवाकाळात सर्वांशी सौदार्याचे व स्नेहाचे संबंधित प्रस्थापित केले होते.केवल सामाजिक बांधिलकी जोपासून त्यांचे आपले गाव,परिसर आणि समाजासाठी नेहमीच प्रत्येक कार्यक्रम प्रसंगी मोलाचे योगदान लाभायचे.तर संपूर्ण आंबेतकर परिवारातही सर्वांशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते.प्रत्येकाच्या सुख-दु:खात हमखास सहभागी होणारे एक वेगळे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची विशेष ओळख होती.

त्यांच्या एकाकी दु:खद निधनामुळे आंबेतकर परिवार,वहूर गाव व परिसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या एकाकी निधनामुळे समाज एका सुस्वभावी समाजबांधवास मुकला असल्याची भावना समाजातून व्यक्त केली जाऊ लागली आहे.

त्यांच्या दु:खद निधनाचे व्रुत्त समजताच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी,त्यांचे आप्तस्वकीय, मित्र परिवार यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या परिवाराचे सात्वंन केले.त्यांच्या पश्चात त्यांची आई,एक मुलगा,एक मुलगी, सुन,जावई,नातवंडे असा परिवार असून त्यांचे अंतिम धार्मिकविधी रवि.दि.२६ सप्टें.रोजी वहूर निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.