Press "Enter" to skip to content

रोहा तालुका पेन्शनर संघटनेच्या अध्यक्षपदी मारुती राऊत यांची निवड

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |

रोहा तालुका पेन्शनर संघटनेच्या अध्यक्षपदी आंबेवाडी नाका येथील रहिवासी मारुती बाळू राऊत यांची निवड करण्यात आली आहे.

रोहा तालुक्यातील पेन्शनर संघटनेची सभा बुधवार दि.२२ सप्टेंबर २०२१ रोजी रोहा येथील जेष्ठ नागरिक सभागृहात आयोजित करण्यात आली होती.या आयोजित करण्यात आलेल्या सभेत रोहा तालुका पेन्शनर संघटनेच्या अध्यक्षपदी मारुती बाळू राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली.तर उपाध्यक्ष शेखर गुंड, सचिव नारायण पाटील, तर सदस्य पदी सुरेश मोरे, देसाई मॅडम, गुडेकर, वाळेकर, बामुगडे,मळेकर मॅडम,गावडे गुरुजी,देशमुख,नागवेकर,यांची निवड करण्यात आली तर नागोठणे विभाग प्रमुख झोलगे,कोलाड विभाग प्रमुख जंगम, तर घोसाळे विभाग प्रमुख भोस्तेकर यांची निवड करण्यात आली आहे.

मारुती राऊत यांना कृषीभुषण पुरस्कार ही मिळाला असुन ते रायगड जिल्हा जेष्ठ नागरिक संघटनेचे सदस्य,कोलाड जेष्ठ नागरिक कार्यकारणी संचालक,या पदावरही कार्यरत असून ते कोलाड विभागातील तरुणांना मोलाचे मार्गदर्शन करत असतात त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे रोहा तालुका पेन्शनर संघटना,कोलाड जेष्ठ नागरिक संघटना, पत्रकार, शैक्षणिक, सामाजिक, तसेच विविध संघटना यांच्याकडून मारुती राऊत यांचे अभिनंदन करण्यात आले असुन पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.