सिटी बेल | नागोठणे |
पाली जवळील आपटवणे (ता.सुधागड) येथील रहिवासी व ज्येष्ठ नागरिक नथुराम बाबू भोईर (वय ९०) यांचे आपटवणे येथीलच त्यांच्या राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आपटवणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी त्यांचे आप्तेष्ट, सगे-सोयरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कै. नथुराम भोईर यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुलगे हरिश्चंद्र, संतोष व रामचंद्र, तीन विवाहित मुली अल्का अनंत साजेकर, संगिता मधुकर जांभुळकर, शकुन झांजू पवार, सुना, जावई, नातंवडे, पतवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे.
दिवंगत नथुराम भोईर यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ व मनमिळाऊ होता. आपल्यापेक्षा वयाने लहान-मोठ्या असलेल्या सर्वच व्यक्तींचा ते आदर करीत असत. आपटवणे गावातील विविध सामाजिक व धार्मिक
कार्यात ते नेहमीच हिरीरीने भाग घेत असत. त्यामुळे कै. नथुराम भोईर यांच्या निधनाबद्दल आपटवणे व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कै. नथुराम भोईर यांचे दशक्रिया विधी शुक्रवार दिनांक १ आॅक्टोबर रोजी उध्दर येथे तर उत्तरकार्य सोमवार दिनांक ४ आॅक्टोबर रोजी आपटवणे येथील त्यांच्या राहत्या घरी होणार असल्याचे भोईर कुटुंबियांकडून सांगण्यात आले.







Be First to Comment