सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत तालुक्यातील ओलमन ग्रामपंचायत हद्दीतील चई गावातील युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
माजी आमदार सुरेश लाड व रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास कर्जत तालुक्यातील ओलमन ग्रामपंचायत हद्दीतील चई गावातील युवकांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.माजी आमदार सुरेश लाड यांच्या नेतृत्वाखाली राजिप उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यामार्फत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायत मधील वर्षानुवर्षे प्रलंबित विकासकामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सुमारे कोटी रुपयांची कामे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. ओलमन ग्रामपंचायत मध्ये देखील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरघोस निधी उपलब्ध करून देऊन प्रलंबित विकासकामे मार्गी लावली आहेत.
ओलमन ग्रामपंचायत हद्दीत तसेच चई गावात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रलंबित विकासकामांसाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने तेथील युवकांनी राजिप उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये प्रवेश केला. मितेश भोळे, करण भोळे, प्रकाश भोळे, अक्षय भोळे, अविनाश भोळे, भरत भोळे, अक्षय भोळे, अरविंद भोळे, पुष्कर भोळे, धनेश भोळे, अल्पेश भोळे, उत्तम भोळे, वैभव हुमने, अनिल हुमने, सुनील हुमने, भरत कराळे, सतीश कराळे, भानुदास कराळे, दिगंबर भोळे, अमोल भोळे, नीरज आगीवले, माही हुमने, अमोल ओखारे, सचिन ओखारे, राहुल आगीवले, ओमकार हुमने, मनीष ठोंबरे, तुषार कराळे, जयेश शिंगोळे, अनिकेत ठोंबरे, जय शिंगोळे, कान्हा ओखारे, बबन ओखारे, नंदू कराळे या युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
या प्रसंगी तालूका अध्यक्ष भगवान चंचे, माजी नगराध्यक्ष शरद लाड, संतोष पाटील, सरपंच मंगल ऐनकर, खांडस ग्रामपंचायत व नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील सर्व प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







Be First to Comment