Press "Enter" to skip to content

कानसा वारणा फाउंडेशनच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

आमदार डॉ.विनयराव कोरे सावकार यांचा पन्नासावा वाढदिवस चौक वावर्लें येथील कानसा वारणा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिपकदादा पाटील व सरपंच कृष्णा पाटील यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करून साजरा करण्यात आला. यावेळी कानसा वारणाचे पदाधिकारी व जनसुराज्य पक्षाचे परीसरातील कार्यकर्ते उपस्थित होते .

या शिबिरात 55 रक्तदात्यांनी रक्तदान केले.यासाठी पदाधिकारी यूवा अध्यक्ष महेंद्र पाटिल व नवी मुंबई यूवा अध्यक्ष अमोल आसूलकर ,यूवा उपाध्यक्ष नागेश यादव व दिपकृष्ण नागरी पतसंस्थेचे मॅनेजर तानाजी पाटील चेअरमन बयाजी आप्पा , माजी सैनिक संपत पाटिल व प्रकाश तवरे विनोद माजलेकर व जेष्ठ नागरीक तातोबा गूरूजी, रामभाऊ भगवान पाटिल, अनील पाटील ,पांडूरंग पाटिल, धिरज लोकरे, नंदू काबंळे, जेष्ठ नागरिक नामू आजया, संपदा कुलकर्णी, सागर इंजिनीयर ,सखाराम तवरे इतर सर्व नागरीक उपस्थित होते.यावेळी आमदार डॉ.विनयराव कोरे यांच्याहस्ते कोरोना काळात ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा दिली त्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी डाॅक्टर,विजमंडळाचे कर्मचारी,शिक्षक आदींचा सत्कार करण्यात आला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.