सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |
राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते आज शुक्रवार, दि.24 सप्टेंबर 2021 रोजी तळा तालुक्यातील कळसांबळे येथे कळसांबळे बौध्दवाडी सामाजिक सभागृहाचे भूमीपूजन, कळसांबळे वाडीतील व्यायामशाळा साहित्य लोकार्पण आणि कळसांबळे गावातील स्मशानभूमी भूमीपूजन संपन्न झाले.

तद्नंतर आडनाळे गौळवाडी येथील गौळवाडी आडनाळे रस्त्याचे तसेच गौळवाडी स्मशानभूमीचे भूमीपूजन तर गौळवाडी अतंर्गत रस्त्याचे उद्घाटन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

यावेळी स्थानिक पदाधिकारी, प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.







Be First to Comment