महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |
रोहा तालुक्यातील गोवे येथील महिला कार्यशाळेत रोहा कृषी विभागाच्या वतीने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.याचे मार्गदर्शन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले.
यावेळी महिला सक्षमीकरणासाठी या योजना कशा प्रकारे लाभदाय आहेत.? व यासाठी महिलांनी स्वतःच्या कर्तृत्वावर आपला छोटा उद्योग उभा करुन आर्थिकदृष्टया सक्षम व्हावे व यासाठी महिला बचत गट एकत्र येऊन काम करणे गरजेचे यासाठी शासनाकडून आम्ही वेळोवेळी आपणास मार्गदर्शन करु असे प्रतिपादन कृषी पर्यवेक्षक हेगडे यांनी महिलांना मार्गदर्शन करतांना केले.तसेच शासनाकडून विविध योजना राबविल्या जात असून याचा फायदा प्रत्येक बचत गटांनी घ्यावा यासाठी कृषी पर्यवेक्षक मढवी व कृषी सहाय्यक श्रीमती दोरुगडे यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
यावेळी गोवे ग्रामपंचायत सदस्या सुप्रिया जाधव,रंजिता जाधव,पोलिस पाटील सुरेश जाधव, संदीप जाधव, तसेच गोवे गावातील १५ बचत गटाच्या पदाधिकारी व सर्व सदस्या उपस्थित होत्या.यावेळी उपस्थित मान्यवरांनी
महिलांना मोलाचे मार्गदर्शन केल्या बद्दल सुप्रिया जाधव यांनी त्यांचे आभार व्यक्त करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Be First to Comment