कर्जत मधील कामांना एमएमआरडीए प्रशासकीय मान्यता
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत नगरपरिषद क वर्गाची नगरपरिषद असल्याने नगर परिषद क्षेत्रात विकास कामांना निधी कमी पडत असतो, सदर विकास कामांना एमएमआरडीएच्या माध्यमातून निधी मिळावा यासाठी कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची वेळोवेळी यांची भेट घेवून कर्जत नगरपरिषदेचे क्षेत्रातील प्रस्ताव सादर केले होते, या प्रस्तावास नगर विकास विभागाच्या कडून कर्जत नगरपरिषद क्षेत्रात 28 कोटी 33 लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
कर्जत नगरपरिषदेच्या अध्यक्षा सुवर्णा जोशी नगरपरिषदेच्यावतीने मुंबई महानगर विकास प्राधिकरण महानगर आयुक्त यांना दि.19 सप्टेंबर 2019 रोजी पत्र देवून नगरपरिषद हद्दीतील विकास कामे बाह्य रस्ते विकास योजनेअंतर्गत प्रस्तावित करून सदर कामांना कर्जत नगरपरिषदेस निधी उपलब्ध करून मिळावा अशी मागणी केली होती. त्यानंतर नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, युवा सेना पदाधिकारी मयूर जोशी, केतन जोशी त्यांना कर्जत नगरपरिषदेमधील विकास कामांना निधी मिळावा अशी विनंती खासदार व नामदार यांच्याकडे केली होती.

यांच्या पाठपुराव्याला यश आले असून खासदार श्रीरंग आप्पा बारणे तसेच नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या पाठपुराव्याला यश एमएमआरडीएच्या माध्यमातून 28 कोटी 34 लाखाचा भरीव निधी मंजूर झाला आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण एमएमआरडीए क्षेत्रातील रस्ते विकास योजने अंतर्गत खालील कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
# कर्जत नगर परिषद हद्दीतील शिवम सोसायटी ते फायर स्टेशन कडे जाणारा रस्ता बांधकाम करणे यासाठी 2 कोटी.
# कर्जत नगरपरिषद हद्दीत भाजी मार्केट मल्टिपरपर युनिट तयार करणेसाठी 2 कोटी.
# कर्जत नगरपरिषद हद्दीत दहिवली येथील विठ्ठल मंदिर ते रमाकांत जाधव यांच्या घरापर्यंत रस्ता करणे 4 कोटी 34 लाख रुपये.
# कर्जत नगरपरिषद हद्दीतील आकुर्ले बामचा मळा येथील रस्ता करणे 4 कोटी 99 लाख रुपये.
# आणि ब-याच वर्षांपासून नागरिकांची मागणी असलेल्या गुंडगे भिसेगांव येथील नागरिकांना कर्जत बाजारपेठेमध्ये येण्यासाठी पाच किलोमीटरचा वळसा घालून हायवे मार्ग यावे लागते त्याऐवजी रेल्वे जुने गेट येथे (सब -वे )भुयारी मार्ग करण्यास 15 कोटी रुपये.
नगरपरिषद क्षेत्रातील अश्या 5 कामांना 28 कोटी 33 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या साठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मावळ चे खासदार श्रीरंग बारणे यांचे सहकार्य लाभले नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी बोलताना सांगितले.







Be First to Comment