Press "Enter" to skip to content

प्रभाकर पांडुरंग मोकल यांना जीवनदीप वार्ताचा राज्यस्तरीय जीवनदीप शिक्षक रत्न पुरस्कार

प्रभाकर पांडुरंग मोकल यांना जीवनदीप वार्ताचा ‘राज्यस्तरीय जीवनदीप शिक्षक रत्न पुरस्कार ‘

पनवेल -प्रतिनिधी
पनवेल तालुक्यातील सु. ए. सो. पालीचे,’आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, माध्यमिक विद्यालय शिरढोण,’ या विद्यालयातील सहा.शिक्षक मुळगाव पेण तालुक्यातील कोपर या गावचे रहिवासी श्री. प्रभाकर पांडुरंग मोकल यांना दैनिक ठाणे जीवनदीप वार्ता तर्फे दिल्या जाणाऱ्या ” २०२१ च्या राज्यस्तरीय जीवनदीप शिक्षक रत्न पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले आहे. शिक्षण राष्ट्राचा सर्वांगीण विकासाचा पाया आहे. अशा या ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात त्याग, समर्पण, कर्तृत्व या जाणीवांनी नि:स्पृह व निरलसपणे कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान शिक्षकांना दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त दैनिक जीवनदीप वार्ता यांच्या वतीने 'राज्यस्तरीय जीवनदीप शिक्षक रत्न पुरस्काराने ', सन्मानित करण्यात येत असते. श्री. प्रभाकर पांडुरंग मोकल यांनी आपल्या अखंडित २७ वर्षीय शैक्षणिक सेवेत ज्ञानाबरोबरच अध्यापन क्षेत्रात प्रयोगशीलता, उपक्रमशीलता तसेच विद्यार्थ्यांच्या इच्छित ध्येयपूर्तीसाठी केलेली धडपड व भारतीय समाजा साठी आदर्शवत दीपस्तंभासारखे केलेले कार्य विचारात घेऊन श्री. मोकल प्रभाकर पांडुरंग यांना "२०२१ चा राज्यस्तरीय जीवनदीप शिक्षक रत्न पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मानाचे वस्त्र, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे. या सोहळ्यास कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार किसन कथोरे (मुरबाड मतदार संघ ), प्रमुख अतिथी म्हणून माननीय निरंजन डावखरे ( आमदार -कोकण पदवीधर मतदारसंघ ), गोपाळ लांडगे (शिवसेना - कल्याण जिल्हाप्रमुख ), तसेच रविंद्र घोडविंदे (जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे संस्थापक,संचालक आणि दैनिक ठाणे जीवनदीप वार्ताचे मुख्य संपादक ) अशा विविध मान्यवारांच्या उपस्थितीत हा सोहळा शनिवार दिनांक १८ सप्टेंबर २०२१ रोजी मुरबाड तालुक्यातील 'जीवनदीप महाविद्यालय गोविले, टिटवाळा पूर्व ' येथे संपन्न झाला. प्रभाकर पांडुरंग मोकल यांना "२०२१ चा राज्यस्तरीय जीवनदीप शिक्षक रत्न पुरस्कार" देवून त्यांच्या कार्याची दखल घेतल्याने आपल्या कार्याची पोचपावती मिळाल्याचे समाधान व्यक्त केले आहे. परंतु त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची आणखी जबाबदारी वाढल्याचेही मत व्यक्त केले आहे.मोकल प्रभाकर पांडुरंग (सहा. शिक्षक ) यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. वसंत ओसवाल सचिव. रवी घोसाळकर व इतर पदाधिकारी, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सोनावणे मॅडम तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, स्थानिक शालेय कमिटी अध्यक्ष व सदस्य, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य, तसेच पंचक्रोशितील अनेक मान्यवर व विशेषत: माजी विद्यार्थी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तर अनेकांनी भ्रमणध्वनी वरून त्यांचे अभिनंदन केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.