अतुल झेंडे पाटील यांनी स्वीकारला रायगड अप्पर पोलीस अधीक्षकचा पदाचा कार्यभार
सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या आदेशानुसार सचिन गुंजाळ यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या रायगडच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदावर अतुल झेंडे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली.
अतुल झेंडे पाटील यापूर्वी सोलापूर ग्रामीण येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून येथे कार्यरत होते. त्यापूर्वी त्यांनी नाशिक आणि रायगड जिल्ह्यात माणगाव येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम केले होते. माणगाव येथे असताना त्यांनी गावठी दारूविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली होती.त्यांच्या या मोहिमेमुळे रायगड जिल्हयात त्याचा दरारा निर्माण झाला होता. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक गुन्ह्याचा तपास यशस्वी रित्या पूर्ण करीत आरोपींना शिक्षेपर्यंत पोहचविले होते.
अतुल झेंडे यांनी सचिन गुंजाळ यांच्याकडून अप्पर पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला. पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी त्यांचे स्वागत केले. सचिन गुंजाळ यांची ठाणे शहर पोलीस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.







Be First to Comment