सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्युनिअर कॉलेज, जासई या विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक,थोर शिक्षण महर्षी,गोर – गरिबांचे कैवारी,पद्मभूषण,डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 134 वा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी कर्मवीर अण्णांच्या पुतळ्याचे व प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच विद्यालयाच्या प्रांगणातील महापुरुषांच्या पुतळ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन केले.कर्मवीर जयंती निमित्ताने कर्मवीर आण्णांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन केले गेले, पुष्पमाला व फुलांनी सजलेल्या आणि त्यात कर्मवीर अण्णांची प्रतिमा विराजमान असलेल्या पालखी ची मिरवणूक विद्यालयाच्या प्रांगणात घोषणांच्या आतिषबाजीत स्कूल कमिटी,शिक्षक व ग्रामस्थ यांनी काढली.
या कार्यक्रमा प्रसंगी विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षिका घरत टी.टी.यांनी विद्यालयास अहुजा कंपनीची एमप्ली फायर मशीन भेट दिली.

या जयंती सोहळ्यास जेष्ठ कामगार नेते व भारतीय मजदुर संघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश पाटील,चेअरमन अरुण जगे, माजी सभापती नरेश घरत, व्हॉईस चेअरमन सखाराम घरत, शिक्षण प्रेमी यशवंत घरत, मधुकर पाटील, अमृत ठाकूर, रघुनाथ ठाकूर, धर्मदास घरत, गणेश पाटील इत्यादी मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
हा जयंती सोहळा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये विद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे लाईफवर्कर अरुण घाग,उपमुख्याध्यापक मोरे पी.पी, पर्यवेक्षक साळुंखे आर. एस.आणि सर्व रयत सेवकांनी मेहनत घेतली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रयत सेवक संघाचे उपाध्यक्ष नूरा शेख सर यांनी केले.







Be First to Comment