साई फाऊण्डेशन चँरिटेबल ट्रस्ट मुंबई व नाईटिंगल चँरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने श्रमिक विद्यालय चिल्हे येथे शैक्षणिक साहित्य वाटप
सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
माहितीचे देवाणघेवाणीचे बाबतीत मोबाईलमुळे फार मोठी क्रांती होऊन सारे जग आपल्या मुठीमध्ये आले असले तरी शालेय विद्यार्थ्यांसाठी मोबाईलचा अतिवापर घातक ठरत असल्याचे प्रकर्षाने पुढे आले असल्याचे समाजसेवक असिफ कासकर यांनी शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थी वर्गाशी हितगुज करीत असताना बोलत होते.
साई फाऊण्डेशन चँरिटेबल ट्रस्ट मुंबई व नाईटिंगल चँरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने रोहे तालुक्यातील श्रमिक विद्यालय चिल्हे येथे संपन्न झालेल्या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब या शिक्षण संस्थेचे चेअरमन महेंद्र पोटफोडे व सर्व संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापक दीपक जगताप, जेष्ठ शिक्षक नरेंद्र माळी,सुनील थिटे,नंदकुमार मरवडे, पांडुरंग शिद आदींसह अन्य शिक्षकवर्ग उपस्थित होते. यावेळी नाईटिंगल चँरिटेबल ट्रस्टचे चेअरमन विरेश कोठारी व साई फाऊण्डेशन चँरिटेबल ट्रस्टचे चेअरमन असिफ कासकर व पदाधिकारी तौसिफ येरुणकर यांच्या महत्वपूर्ण सहकार्याने विद्यार्थी वर्गासाठी विविध प्रकारच्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

तर या दोन्ही ट्रस्टचे वतीने कोरोना महामारीचे कठिण काळात देखील तालुक्यातील विविध माध्यमिक व प्राथमिक शाळेतील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांना अशाप्रकारचे शैक्षणिक साहित्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य केले आहे.विद्यार्थी वर्गाने अभ्यासावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करून आपला उत्कर्ष साधावा असे शेवटी असिफ कासकर यांनी सांगितले .या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार नंदकुमार मरवडे यांनी व्यक्त केले.







Be First to Comment