Press "Enter" to skip to content

पावसाचे धुमशान, बळीराजा चिंताग्रस्त : पावसाने पळविले शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी

सिटी बेल | काशिनाथ जाधव | पाताळगंगा |

गेले अनेक दिवस पाऊस शांत असतांना गणपती विसर्जनानंतर पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाल्यामुळे अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पावसाचे धुमाशान सुरु असून पाऊस शांत होईल,मात्र तसे न होता पावसाने तालुक्यात चांगलाच धुमाकूळ घातले.असून जिकडे तिकडे पाणीचं पाणी पाहावयास मिळत आहे.तर बळीराजा या पावसामुळे चांगलाच धास्तावले आहे. भात शेतीला चांगले पिक आले असून लोंब्यामध्ये दाणा सुद्धा तयार होत असतांना भात शेती पडत आहे.

ग्रामीण भागातील पावसामूळे रस्त्यांची दुरवस्था निर्माण होवून वाहतूकीची कोंडीची समस्या डोके वर काढत आहे.तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शेती, लहान नाले जलमय झाले आहेत. दिवसभरच्या पाऊसाने या परिसरातील ओहळ आणि बंधारे दुथडी भरून वाहत आहेत.मात्र काही ठिकाणी असलेल्या जुन्या फरशी पूलावरून पाणी जात असल्यामूळे हे पाणी रस्त्यापर्यंत पाण्याने धोक्याची पातळी पार केली आहे. गेले काही दिवसांपासून संततधार पडत असल्यामूळे सकाळी कामावर वेळेत पोहोचण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.

पावसाच्या तांडवामुळे जिकडे तिकडे पाणीचं पाणी पाहावयास मिळत आहे.पावसामुळे भात शेतीचे खोड किड्यांचा प्रादुर्भाव निर्माण होण्याची दाट शक्यता शेतकरी वर्गाकडून वर्तविली जात आहे यामुळेच बळीराजा पुरता हैराण झाला आहे. भात शेतीचे उत्पन्न दिवसेंदिवस घटत चालले असून त्यातच शेती लागवड अल्प होत आहे.मात्र दर वर्षी नैसर्गिक आपत्ती मुळे बळीराजा खचत चालला आहे.तालुक्यात सक्रिय झालेला पाऊस दोन दिवसापासून सलग धो…धो बरसत आहे.क्षणंभर विश्रांती नंतर पाऊस पुन्हा सक्रिय होत आहे. तालुक्यासह जिल्हात पावसाच्या कोसळधार सुरू सुरुच आहे.यामुळे नोकरदारांची कामावर जाताना तारांबळ उडत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.