प म पा क्षेत्रात जंतनाशक दिन साजरा
नगरसेविका डॉ सुरेखा मोहोकर यांच्या हस्ते जंतनाशक गोळ्यांचे वाटप


आज २१ सप्टेबर २०२१ रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे औचित्य साधून एकात्मिक बाल विकास प्रकल्प व पनवेल महानगर पालिका आरोग्य विभाग यांच्यामार्फत वय वर्षे १ ते १९ वयोगटातील बालकांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. पनवेल महानगरपालिकेच्या प्र. क्र.१८ मधील वाल्मिकी नगर येथील कार्यक्रमास नगरसेविका डॉ सुरेखा मोहोकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.त्यांनी मुलांना जंतनाशक गोळ्या दिल्या तसेच जंतनाशक गोळ्यांचे सेवन करण्याचे महत्त्व सांगितले.या उपक्रमास डॉ मोहोकर यांच्या समवेत डॉ.अंजली घरत व आशा सेविका,परिचारिका उपस्थित होत्या.






Be First to Comment