सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर |
खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या केएमसी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागास पीएचडी संशोधन केंद्राची मुंबई विद्यापीठाची मान्यता मिळाली आहे.
संशोधनपर शिक्षणक्रम महाविद्यालयात सुरू झाल्यामुळे खोपोली, खालापूर, कर्जत, नेरळ, चौक, वावोशीसह जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना रसायनशास्त्र विषयात पीएचडी चे संशोधन संधी उपलब्ध झाली आहे.
महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख व प्रभारी प्राचार्य डॉ. महेश खानविलकर, डॉ. शरद पंचगल्ले व डॉ.अशोक पाटील यांना मार्गदर्शक म्हणून मुंबई विद्यापीठाची मान्यता आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी पीएच.डी.चे संशोधन आता करू शकणार आहेत.महाविद्यालयास संशोधन केंद्र मिळण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम, उपाध्यक्ष संजय पाटील, कार्यवाह किशोर पाटील , महाविद्यालयाचे उपाध्यक्ष राजेश अभाणीसह माजी पदाधिकारी यांनी विशेष प्रयत्न केले. पीएचडी प्रवेशासाठीची प्रक्रिया महाविद्यालयाने सुरू केली असून एम.एससी. (रसायनशास्त्र) झालेल्या विद्यार्थ्यांनी 30 सप्टेंबर पूर्वी पीएच.डी. प्रवेशासाठी महाविद्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य खानविलकर यानी केले आहे.







Be First to Comment