काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी अलिबाग येथील काँग्रेस भवन येथे आयोजित आढावा बैठकीत व्यक्त केला विश्वास
सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |
रायगड जिल्ह्यात कितीही उलाढाली घडल्या व उलथापालथी झाल्या तरी कॉंग्रेस पक्ष रायगड जिल्ह्यात यापूर्वीही एक नंबर होता, आजही एक आहे आणि भविष्यातही एक नंबरच राहील असा असा प्रबळ आत्मविश्वास काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी अलिबाग येथील काँग्रेस भवन येथे आयोजित आढावा बैठकीत व्यक्त करताच जिल्हाभरातुन आलेल्या उपस्थित प्रमुख कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.

यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदेशच्या सरचिटणीस नंदा पाटील, महाराष्ट्र सेवा दलाच्या सदस्या मोनिका पाटील, जिल्हा अध्यक्षा श्रद्धा ठाकूर,अनंत गोंधळी,अलिबाग तालुका अध्यक्ष योगेश मगर,बेलोशी सरपंच कृष्णा भोपी,कविता ठाकूर,माजी अध्यक्ष ऍड.जे.टी. पाटील,सुदाम पाटील,मिलींद पाडगावकर यांच्यासाहित इतर मान्यवर उपस्थित होते.

रायगड जिल्हा हा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा बॅ. अंतुले यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांची कर्मभूमी आहे. या भूमीत काँग्रेसची पाळेमुळे खोलवर रुजली असल्याने जिल्हा काँग्रेसला परत पुनर्जिवित करणे फारसे अवघड काम नाही. सर्वधर्म समभाव जपणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकत्यांनी एकदिलाने काम केल्यास जिल्ह्यात काँग्रेसचे वर्चस्व पुन्हा निर्माण करण्यास वेळ लागणार नाही, काँग्रेस पक्षात पूर्वी फितुरीचे प्रमाण अधिक होते. त्याचा फायदा काँग्रेसला न होता तो अन्य पक्षांना व्हायचा.आता मात्र फितुरीचे प्रकार खपवून घेणार नाही, असा इशाराही घरत यांनी यावेळी दिला. आगामी निवडणुका लक्षात घेता जिल्हयातील सर्वसामान्य कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करूनच योग्य निर्णय घेत कुठल्या पक्षाबरोबर आघाडी करायची की नाही.किंवा स्वबळावर लढण्याची ताकत सुध्दा ठेवून आहोत.यापूर्वी काँग्रेस पक्षाचा वापर इतर पक्षांनी केला मात्र त्यांनी त्याची जाण ठेवली गेली नाही आणि कॉग्रेस कार्यकर्ते यांचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न केले गेले अशी वेळ आता यापुढे येता कामा नये यासाठी आमची स्वबळावर सुद्धा लढण्याची तयारी ठेवून आहोत.माजी आमदार कैलासवासी मधुकर ठाकूर(पप्पा) यांना खरी श्रद्धांजली वाहायची असेल तर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच आगामी निवडणुकीसाठी तयार राहून अलिबाग तालुक्यात किमान काँग्रेस पक्षाच्या दोन जिल्हापरिषद जागा आणि चार पंचायत समितीच्या जागा निवडून येणे गरजेचे आहे.यापुढे काँग्रेस पक्षाचा वापर हा कुठल्याही पक्षाला करून देणार नाही.नगरपालिका निवडणूक साठी पनवेल,उरण,कर्जत,येथे शिवसेना आमच्यासोबत आघाडी करण्यास तयार आहे मात्र महाड येथे काँग्रेस पक्ष हा शिवसेना विरोधात लढत राहिला आहे त्यामुळे तिथेही स्नेहल जगताप यांच्याशी चर्चा केली जाईल.

यावेळी नंदा म्हात्रे,कृष्णा भोपी,योगेश मगर यांनी आपले मनोगत व्यक्त केले







Be First to Comment