सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
सारसई दुर्गम भागातील बागेचीवाडी रा.जि.प.शाळेत काॅम्पुटर व प्रिंटरचा अभाव असल्याने शाळेय शिक्षकांसमोर विविध समस्या असायच्या.बागेचीवाडी हा दूर्गंम परिसर असल्याने परिसरात समस्या अधिक आहेत.येथील आदीवासी,ठाकूरजमात व धनगर कुटुंबातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शाळेय शिक्षण मिळावे यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंगाडे नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांनी उद्योजक चंद्रकांत बावदाने यांच्याकडे बागेचीवाडी शाळेतील समस्या मांडून शाळेला काॅम्पूटर व प्रिंटर संच देण्याची मागणी उद्योजक चंद्रकांत बावदाने यांच्याकडे केली होती.सदर समस्या लक्षात घेऊन बावदाने यांनी बागेचीवाडी शाळेला काॅम्पूटर व प्रिंटर संच भेट दिला.
बागेचीवाडी राजिप शाळेला काॅम्पूटर संच मिळाल्याने मुख्याध्यापक,शिक्षक व विद्यार्थ्यांच्या चेह-यावर समाधानाचे वातावरण दिसून आले.त्यांनी उद्योजक चंद्रकांत बावदाने व संतोष शिंगाडे यांचे आभार मानले.

यावेळी शिवसेना केळवणे जिल्हा परिषद विभागप्रमुख चंद्रकांत टकले, संपर्क प्रमुख अशोक थोरवे, जांभीवली शाखा प्रमुख वैभव कोंडीलकर, चावंढोली शाखा प्रमुख प्रशांत चितले ,सामाजिक कार्यकर्ते तुकाराम गायकवाड , महेश भोपी, बागेची वाडी शाळेचे मुख्याध्यापक अमित चव्हाण , राजेश भोंड सर, नागनाथ सर, तसेच ग्रामस्थ कृष्णा वाघे, अंकुश नाईक व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष शिंगाडे यांनी केले.







Be First to Comment