Press "Enter" to skip to content

सेवानिवृत्त मुख्याध्यापिका अनुराधा म्हात्रे यांचे निधन

सिटी बेल | उरण | वैशाली कडू |

उरण तालुक्यातील चिरनेर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अविनाश म्हात्रे व ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत म्हात्रे यांच्या मातोश्री व सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिक्षक राजाराम म्हात्रे यांच्या पत्नी निवृत्त मुख्याध्यापिका अनुराधा राजाराम म्हात्रे (81) यांचे काल अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या अचानकपणे जाण्याने त्यांच्या म्हात्रे कुटुंबियांवर मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर चिरनेर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

अनुराधा म्हात्रे या रायगड जिल्हा परिषदेतील उरण,पनवेल तालुक्यासह माणगाव व पोलादपुर तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील खेड्यातील प्रार्थमिक शाळेत शिक्षिका म्हणून काम करित असतांना त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले आहेत. शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असतांना अतिशय प्रेमळ स्वभावामुळे जनमाणसात त्यांनी माणुसकीची ओळख निर्माण केली होती.

त्यांच्या पश्चात त्यांचे पती सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजाराम म्हात्रे, तीन मुलगे,सुना आणि नातवंडे असा त्यांचा मोठा परिवार आहे.त्यांचा दशक्रिया विधी श्री क्षेत्र चिरनेर खाडी येथे बुधवार दि. 29 सप्टेंबर रोजी होणार असून उत्तरकार्य चिरनेर येथिल राहत्या घरी 1 ऑक्टोबर 2021 रोजी होणार असल्याचे त्यांचे चिरंजीव प्रशांत म्हात्रे यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.