Press "Enter" to skip to content

चंद्रकांत मारुती कडू यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन

शेकाप चे पनवेल महानगरपालिका जिल्हा चिटणीस गणेश कडू यांना पितृशोक

सिटी बेल लाईव्ह/ पनवेल #

चंद्रकांत मारुती कडू यांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी अर्थात 5 जुलै 2020 रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास देवाज्ञा झाली. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी ते 84 वर्षांचे होते.त्यांच्या निधनाने शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल जिल्हा चिटणीस गणेश कडू यांच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले आहे.रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर सामाजिक अंतर रखण्याबाबतचे सर्व निकष पाळत अंत्यसंस्कार करण्यात आले. चंद्रकांत कडू यांचा जन्म -४ एप्रील १९३७ रोजी झाला.वयाच्या १९व्या वर्षी म्हणजेच १९५६ साली एस टी महामंडळाच्या सेवेत वाहक (कंडक्टर) म्हणुन ते रुजू झाले.या कालावधीत त्यांना ऊत्कृष्ट सेवा पुरवण्याचा पुरस्कारही मिळाला होता .निरंतर चांगली सेवा पुरवण्यामुळे पुढे त्यांना कंट्रोलर म्हणुन पदोन्नती मिळाली .कंट्रोलर म्हणुन काम करत असताना पनवेल मधील अनेक दिग्गज लोकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते .आर सी घरत (भाई) ह्यांना कामगार यूनियन मध्ये वेळोवेळी लागणारे सहकार्य ते करत असत . सदा हसत मुख ,मितभाशी मनमिळावु असे व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी तीन मुली ,दोन मुले ,जावई सुना व नातवंडे पतवंडे आसा मोठा परिवार आहे.सध्याची कोरोना विषाणू मुळे उद्भवलेली महामारीची परिस्थिती पाहता, कडू कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी शक्यतो प्रत्यक्ष न येता फोनवरून सांत्वन करावे अशी विनंती कै. चंद्रकांत कडू यांचे सुपुत्र गणेश कडू यांनी केली आहे.

मंगळवार दि 14 जुलै रोजी चंद्रकांत कडू यांचे ऊत्तर कार्य पोदी स्मशान भुमी येथे व तेरावे १७ जुलै रोजी राहत्या घरी होणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.