सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
रोहे तालुक्यातील गावदेवी मित्र मंडळ व उदय व्यायाम मित्र मंडळ संलग्न शिवराय मित्र मंडळ नडवली (ठाणे-मुंबई) या नावाजलेल्या मंडळाचे अध्यक्षपदी महेंद्र भोसले तर उपाध्यपदी विठोबा दळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, कला,क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या
गावदेवी मित्र मंडळ व उदय व्यायाम मित्र मंडळ संलग्न शिवराय मित्र मंडळ नडवली(ठाणे-मुंबई) यांच्या वतीने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत विविधांगी कार्यक्रम संपन्न केले जात आहेत. तर शिवराय मित्र मंडळ ठाणे-मुंबई (नडवली) या मंडळाचे तसेच गावदेवी मित्र मंडळ व उदय व्यायाम मंडळ या तिन्ही मंडळाच्या सदस्यांची नुकतीच नडवली गावी संपन्न झालेल्या जाहीर सभेमध्ये सर्वानुमते महेंद्र भोसले यांची अध्यक्षपदी तर विठोबा दळवी यांची उपाध्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी येथील उपसरपंच व युवा नेते मनोज शिर्के, मंडळाचे कार्यकर्ते किशोर जाधव,सुमित जाधव,अशोक शिर्के, अभिजित भोसले,अजय भोसले,भूषण वरखले,संदीप शिर्के,रमेश जाधव, सचिन जाधव, सचिन शिर्के, अजित लाडगे, नितीन मोहिते,लक्ष्मण लाडगे, हरेश जाधव आदी उपस्थित होते. महेंद्र भोसले यांची अध्यक्ष तर विठोबा दळवी यांची उपाध्यक्षटदी सर्वानुमते नियुक्ती करण्यात आल्यानंतर उपस्थिती आल्यानंतर उपस्थितीतांच्या वतीने दोघांचेही हार्दिक अभिनंदन व्यक्त करून शुभेच्छा देण्यात आल्या.







Be First to Comment