… आणि ते पुन्हा आले ! दोनचं दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी केला होता राष्ट्रवादीत प्रवेश
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील मौजे भोपळेवाडी येथील संपूर्ण गावाने दोन दिवसांपूर्वी एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये प्रवेश केला होता, त्याच ग्रामस्थांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. विकास कामांचे आश्वासन देऊन राष्ट्रवादीत प्रवेश करून घेतला होता असा आरोप शिवसेनेने केला आहे.
दिनांक 19 सप्टेंबर रोजी भोपळीवाडी येथील ग्रामस्थांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता. सदर प्रवेश करतेवेळी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने खोटे आश्वासन व दिशाभूल करून पक्ष प्रवेश घेण्यात आला होता. असे शिवसेनेचे म्हणणे आहे, पक्ष प्रवेश करतेवेळी आम्हीच गोरगरीब जनतेचे पाईक आहोत असा आवआणून संपूर्ण गावाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असे दर्शविण्यात आले होते.
काल दिनांक 20 सप्टेंबर रोजी आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्यप्रणालीवर व नेतृत्वावर विश्वास ठेवत पुन्हा एकदा भगव्या झेंड्याखाली घरवापसी केली असून भोपळीवाडी येथील राष्ट्रवादीच्या पक्ष प्रवेश्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. या प्रसंगी तालुका संघटक शिवराम बदे, माजी उपसभापती मनोहर थोरवे, उपतालुका प्रमुख भरत डोंगरे, विभाग प्रमुख रवी ऐनकर, रवी फोपे, माजी सरपंच नागेश साबळे तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रवेश करतेवेळी आमदार महेंद्र थोरवे यांचा स्थानिक आमदार विकास निधी सन 2021-22 निधी अंतर्गत भोपळेवाडी येथे सामाजिक सभागृह बांधणे करिता निधीचे पत्र ग्रामस्थांकडे यावेळी सुपूर्त करण्यात आले.







Be First to Comment