Press "Enter" to skip to content

माथेरान नगरपरिषदेच्या दवाखान्यातील गलथान कारभारामुळे फोटोग्राफर तरुणाचा बळी

डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे फोटोग्राफर तरुणाला गमवावे लागले प्राण

सिटी बेल | माथेरान | मुकुंद रांजाणे |

काही वर्षांपूर्वी माथेरान मध्ये फोटोग्राफरचा व्यवसाय करन्यासाठी आलेले आणि अल्पावधीतच सर्वांशी आपुलकीने वागणारे नकीम हकीम शेख या तरुणाला दि.१९ रोजी हृदयविकाराचा तीव्र झटका आला असता माथेरान नगरपरिषदेच्या दवाखान्यात डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे वेळेत उपचार मिळू न शकल्यामुळे आपले प्राण गमवावे लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे गावात नगरपरिषदेच्या या गलथान कारभाराबाबतीत संताप व्यक्त केला जात आहे.

येथील शारलोट लेक या ठिकाणी नकीम शेख हे नेहमीप्रमाणे आपला फोटोग्राफीचा व्यवसाय करून घरी आल्यावर त्यांची तब्बेत अचानक बिघडली असता त्यांना दवाखान्यात उपचारासाठी नेण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही.यामध्ये बराच वेळ वाया गेला त्यामुळे अत्यंत अडचणीचा भाग असणाऱ्या दाट वस्तीतील संत रोहिदास नगर येथून शेजारील मित्र परिवाराने त्यांना हातरीक्षा मधून दवाखान्यात नेले होते.परंतु त्याठिकाणी सुध्दा नव्याने रुजू झालेले डॉक्टर रॉय हे उपस्थित नव्हते अशावेळी त्यांना पुढील उपचारासाठी अन्य ठिकाणी हलविण्यात आले परंतु तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनीत्यांना मृत घोषित केले.

माथेरान हे प्रदूषण मुक्त पर्यटनस्थळ असल्याने इथे मोटार वाहनांना बंदी आहे केवळ स्थानिकांच्या मागणीनुसार इथे रुग्णांना तसेच वेळप्रसंगी पर्यटकांना अत्यावश्यक सेवा उपलब्ध असावी यासाठी रुग्णवाहिका कार्यान्वित करण्यात आली आहे. सदर रुग्णवाहिका काही नगरसेवकांच्या घरची गाडी असल्याप्रमाणे तिचा सर्रासपणे नेहमीच भाडे सुध्दा न देता दुरुपयोग केला जात असतो.यावर कुणाचाही अंकुश नसल्यामुळे गैरवापर केला जात असून यात मोठया प्रमाणावर आर्थिक उलाढाल सुध्दा होत असते हे नागरिकांना सुध्दा ज्ञात आहे.

अनेकदा अत्यावश्यक वेळेस ही रुग्णवाहिका उपलब्ध होत नसते तर १०८ ह्या रुग्णवाहिकेत सुध्दा वारंवार तांत्रिक बिघाड असल्याचे सांगितले जाते.मागील काही वर्षांपासून या रुग्णवाहिकेचा वडाप सारखाच वापर सुरू असून चोवीस तास प्रतिष्ठित लोकांच्या सेवेत विना मोबदला असते.एक नव्हे तर एकूण तीन रुग्णवाहिका इथे उपलब्ध आहेत परंतु वेळेवर एकही उपलब्ध होऊ शकली नाही त्यामुळे एका सर्वसामान्य फोटोग्राफरला आपले प्राण गमवावे लागले आहेत.

अनेक दानशूर लोकांनी या दुर्गम भागातील दवाखान्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री असलेली उपकरणे देणगी दाखल दिलेली आहेत त्याचा उपयोग अथवा ही मशिनरी हाताळण्यासाठी कर्मचार्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही नगरपरिषदेचा एवढा सैल कारभार पाहून नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

माथेरान मधील आरोग्य व्यवस्थे विषयी अनेक वेळा मी सभागृहात आवाज उठवला काही दिवसांपुरता थोडा फरक पडतो व परत परीस्थिती जैसे थी.अत्यंत आवश्यक आसलेल्या आरोग्य व्यवस्थेकडे सत्ताधारी आणि प्रशासन हे दोघेही दुर्लक्ष करत आसुन यांच्या अकार्यक्षमतेमुळे नाकरीकांना नाहक जिवास मुकावे लागत आहे.सदर डाॅकटरला निलंबित करुन त्यांच्यावर विभागीय चौकशी बसवावी.

शिवाजी शिंदे
--काँग्रेस नगरसेवक माथेरान

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.